08 March 2021

News Flash

दिग्विजय सिंह यांचा अमृता राय यांच्याशी विवाह

दिग्विजय सिंह हे ६८ वर्षांचे असून त्यांचा विवाह संपन्न झाल्याचे त्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांचा विवाह दूरचित्रवाणीच्या सादरकर्त्यां अमृता राय यांच्याशी चेन्नई येथे गेल्या महिन्यात संपन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिग्विजय सिंह हे ६८ वर्षांचे असून त्यांचा विवाह संपन्न झाल्याचे त्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले. श्रीमती राय या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. राज्यसभा टीव्हीच्या कार्यालयाने त्या रजेवर असल्याचे म्हटले आहे. सिंह यांनी अमृता राय (वय ४४) यांच्याशी संबंध असल्याचे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जाहीर केले होते. त्या आणि त्यांच्या पतीने परस्पर सामंजस्याने घटस्फोट घेत असल्याचा दावा दाखल केला आहे. या दाव्याचा निकाल लागल्यानंतर आमचे संबंध अधिकृत होतील, असे दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर म्हटले होते. राय यांनीही दिग्विजय सिंह यांच्याशी संबंध असल्याचे ट्विटरवर मान्य केले होते. आपण पतीपासून वेगळे होत आहोत व परस्पर सामंजस्याने घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे, असे त्यांनी म्हटले होते.
सिंह यांच्या पत्नीचे २०१३ मध्ये प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले असून त्यांना चार मुली व एक मुलगा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 2:01 am

Web Title: digvijay marry with amruta rai
Next Stories
1 विकसित देशांना मोठा आर्थिक विकास दर गाठणे कठीण!
2 एक पद एक निवृत्तिवेतन म्हणजे काय?
3 तीन महिन्यांनंतर माजी सैनिकांचे उपोषण मागे
Just Now!
X