07 March 2021

News Flash

भाजप उमेदवारास आयोगाची तंबी

मध्य प्रदेशात अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार विश्वास सारंग यांना दोषी ठरवून निवडणूक आयोगाने कडक शब्दांत तंबी दिली आहे.

| November 29, 2013 12:15 pm

मध्य प्रदेशात अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार विश्वास सारंग यांना दोषी ठरवून निवडणूक आयोगाने कडक शब्दांत तंबी दिली आहे. २५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान, आचारसंहिता लागू असतानाही सारंग यांनी एका जैन मंदिरासाठी एक लाख रुपयांची देणगी दिल्याचे सांगण्यात आले. सारंग यांनी आयोगास पाठविलेल्या पत्रात देणगी दिल्याचे मान्य केले परंतु आपले हे कृत्य क्षणात घडल्याची मखलाशी त्यांनी केली. सारंग यांचे हे उत्तर समाधानकारक न वाटल्यामुळे आयोगाने त्यांना दोषी ठरवून या प्रकरणी पुन्हा असे न करण्यासंबंधी कडक शब्दांत तंबी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 12:15 pm

Web Title: election commision warn bjp candidate
Next Stories
1 सीसीटीव्हीत आणखी पुरावे सापडले
2 ‘मध्य प्रदेशात ३० हजार आदिवासी मुली बेपत्ता’
3 अणू ऊर्जेसाठी पैसे देणार नाही ; जागतिक बँकेचे स्पष्टीकरण
Just Now!
X