07 April 2020

News Flash

मोदींच्या टीकेनंतर अमेरिकेनेही पाकला भरला दम

आपल्या भूमीत भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी कोणताही कट शिजला जाणार नाही

काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याअगोदर भारताने अमेरिकेला याबद्दल काही माहिती दिली होती का, याला पुष्टी मिळालेली नाही. अमेरिकेने या माहितीला दुजोरा दिलेला नाही. त्याचबरोबर ते स्पष्ट शब्दांत फेटाळलेलेही नाही.

भारताच्या शेजारीच दहशतवादाचा गड असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या संसदेत केल्यानंतर अमेरिकेनेही पाकला दम भरला आहे. आपल्या भूमीत भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी कोणताही कट शिजला जाणार नाही, याची काळजी पाकिस्तानने घ्यायला हवी आणि तशी हमी देखील त्यांनी द्यावी, असा दम अमेरिकेने पाकला भरला आहे. अमेरिकेची ही भूमिका म्हणजे पाकिस्तानला भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठीची महत्त्वाची संधी आहे, असे अमेरिकेचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले.
भारत आणि पाकिस्तान हे परस्पर सहकार्यासाठी थेट संवाद साधून, आपापसातील तणाव दूर करण्यासाठी एकत्र येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पण त्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर भारताविरोधात दहशतवादी कारवायांचे कट शिजणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. दहशतवादी गटांना प्रतिबंध करायला हवा, असेही ते पुढे म्हणाले. याशिवाय, दहशतवादाचे प्रशिक्षण देणाऱया अनेक संघटना पाकिस्तानात असल्याचे मत टोनर यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 3:31 pm

Web Title: ensure your territory is not used to plan attacks in india us tells pakistan
Next Stories
1 US President: अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी बराक ओबामांचा हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा
2 एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला मेक्सिकोचाही पाठिंबा जाहीर
3 रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी राज्यांनी सहकार्य करावे – प्रभू
Just Now!
X