News Flash

स्टीफन हॉकिंग यांच्या असमान्य व्हिलचेअरचे फिचर्स वाचून तुम्ही थक्क व्हाल

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आज पहिली पुण्यतिथी

स्टीफन हॉकिंग यांच्या असमान्य व्हिलचेअरचे फिचर्स वाचून तुम्ही थक्क व्हाल
हॉकिंग यांची व्हिलचेअर

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आज पहिली पुण्यतिथी. भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या जीवनप्रवासाने अनेकांनाच प्रेरणा मिळाली. शारीरिक व्याधींवर मात करत एक असामान्य आयुष्य जगलेल्या आणि तितकीच अद्वितीय कामगिरी केलेल्या हॉकिंग यांनी मांडलेले सिद्धांत संशोधनाची परिभाषा बदलण्यास कारणीभूत ठरले. बिग बॅंग थिअरी असो किंवा मग देव अस्तित्वातच नाही, असं म्हणणारे हॉकिंग असो. वेळोवेळी त्यांच्या प्रत्येक सिद्धांताने अनेकांनाच खडबडून जागं केलं. हॉकिंग यांच्या सिद्धांताप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भागही नेहमीच चर्चेचा विषय ठरला. तो भाग म्हणजे त्यांची व्हिलचेअर.

हॉकिंग यांना ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने ग्रासले होते. गेली अनेक वर्ष त्या आजाराशी झगडत होते. या साऱ्या प्रवासात ते एका व्हिलचेअरवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायचे. त्यामुळेच ही अनोखी खुर्ची त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बनवण्यात आलेल्या या व्हिलचेअरच्याच सहाय्याने हॉकिंग यांचे विचार साऱ्या जगापर्यंत पोहोचले. त्यांना बोलता येत नसलं तरीही याच व्हिलचेअरच्या सहाय्याने त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत बऱ्याचदा उपस्थितांना आपल्या विचारांनी प्रेरित केल्याचं पाहायला मिळालं. अशा या आगळ्यावेगळ्या व्हिलचेअरविषयी सर्वांनाच आकर्षण लागून राहिलेलं होतं. उत्तम आणि आधुनिक तंत्राची जोड देत तयार करण्यात आलेल्या व्हिलचेअरमध्ये नक्की कोणकोणते विशेष गुण आहेत हे खुद्द हॉकिंग यांनीच त्यांच्या ब्लॉगमधून सर्वांसमोर उघड केले होते.

वाचा : अखंड ब्रह्मांडात रमणारा मित्र

१९९७ पासून ते या व्हिलचेअरचा वापर करु लागले होते. जी इंटेलतर्फे तयार करण्यात आली होती. या व्हिलचेअरमध्ये एक टॅबलेट कम्प्युटर लावण्यात आला होता. ज्यावर असणारा कर्सर हॉकिंग यांच्या गालाच्या हालचालीने नियंत्रित केला जात असे. ज्यामध्ये त्यांच्या गालांची हालचाल चष्म्यात लावण्यात आलेल्या इन्फ्रारेड स्वीचच्या सहाय्याने डिटेक्ट केली जायची. ACAT एसीएटी या प्रोग्रामच्या सहाय्याने या गोष्टी साध्य होत होत्या. ज्यामध्ये ‘स्वीफ्ट की’च्या स्वरुपात एखाद्या शब्दाचा अंदाज बांधण्याचे अल्गोरिदमही देण्यात आले होते. त्यामुळे एखादा शब्द निवडण्यापूर्वी हॉकिंग यांना त्यातील आद्याक्षरच टाईप करावी लागत होती. या व्हिलचेअरशी जोडण्यात आलेल्या संगणकामध्ये ‘स्पीच सिंथेसायझर’सुद्धा होता. त्याच्या सहाय्याने हॉकिंग यांच्या बोलण्याचे उच्चारण विविध प्रकारे करणे शक्य होऊ शकत होते.

ACAT या प्रोग्रामच्या सहाय्याने हॉकिंग स्वत: तो संगणक चालवू शकत होते. इतकेच नव्हे तर, मायक्रोसॉफ्ट आऊटलूकच्या मदतीने ते इमेलही पाहू शकत होते. मेंदू, तंत्रज्ञान आणि एक असामान्य व्यक्तीमत्त्व या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर नेमकं काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे खुद्द स्टीफन हॉकिंग आणि त्यांची एकमेव व्हिलचेअर.

हॉकिंग यांच्या व्हिलचेअरची काही वैशिष्ट्ये :
Lenovo Yoga 260 provided by Lenovo and Intel
Intel® Core™ i7-6600U CPU
512GB Solid-State Drive
Windows 10
ACAT interface software provided by Intel

Speech Synthesizers (3 copies):
Manufacturer – Speech Plus (Incorporated 1988, Mountain View, CA)
Model – CallText 5010
Speaker and amplifier provided by Sound Research

Permobil F3 wheelchair provided by Permobil

 

(वरील सर्व माहिती स्टीफन हॉकिंग यांच्या ब्लॉगवरुन….)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 5:27 pm

Web Title: everything you want to know about professor stephen hawkings wheelchair and special computer
Next Stories
1 महिलांसाठी हे आहेत दहा सुरक्षित आणि असुरक्षित देश
2 राफेल पेपर्स लीक : केंद्राच्या विशेषाधिकारावर सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून
3 …म्हणून सर्व सरकारी कार्यालयातील सिलिंग फॅन काढून टाका; चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाची मागणी
Just Now!
X