News Flash

महागाईचा मार, पेट्रोल ८८ पार ; आज पुन्हा दर वाढले

दिवसेंदिवस सुरू असलेली इंधन दरवाढ आज देखील सुरूच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस सुरू असलेली इंधन दरवाढ आज देखील सुरूच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा प्रत्येकी २३ पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, मुंबईत पेट्रोलचा आजचा दर ८८.१२ रू. प्रतिलिटर तर डिझेल ७७.३२ रू. प्रतिलिटर झाला आहे. तर, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर ८०.७३ रुपये आणि डिझेलचा दर ७२.८३ रु. प्रतिलिटर झाला आहे. काल पेट्रोल १२ पैशांनी तर डिझेलच्या दरात ११ पैशांची वाढ झाली होती. त्यामध्ये आज पुन्हा भर पडल्याने मोठा फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागत असून येथे तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे.


दुसरीकडे, पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 8:43 am

Web Title: fuel price continue to increase
Next Stories
1 एचडीएफसी बँकेचे बेपत्ता अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या, आरोपीची कबुली
2 Bharat Bandh : पेट्रोल-डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत येईपर्यंत जनआंदोलन-काँग्रेस
3 २०२२ पर्यंत नवभारताची निर्मिती
Just Now!
X