Google Doodle: World Wide Web सर्च इंजिन गुगल आणि अशा अनेक वेबसाईट्सचे मूळ हे इंटरनेट आहे आणि आज गुगलने नेहमीप्रमाणे अनोखे डुडल ‘वर्ल्ड वाइड वेब’ तयार केले आहे. गुगलने world wide web (www) च्या ३० व्या वर्धापन दिनावर हे डुडल बनवले आहे. कोणत्याही वेबसाईटच्या आधी असलेले www हे त्यात प्रदर्शित होणाऱ्या वेगवेगळ्या रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचा ग्रूप असतो, जे एकमेकांना जोडून वेबसाईट तयार होते. याचा शोध टीम बर्नर ली यांना लावला. गुगलने या डुडलबरोबर टीम यांच्या योगदानाचेही स्मरण केले आहे.

जगाला इंटरनेटची भेट देणाऱ्या टीम बर्नर ली यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी १९७६ मध्ये भौतिक शास्त्राची पदवी घेतली. त्यांना गणितातही गती होती. त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी नेहमीच पाठिंबा दिला. जिनेव्हा येथील युरोपीय आण्विक संशोधन संघटनेत (सीईआरएन) काम करत असताना टीम यांनी वर्ल्ड वाइड वेब तयार केले. सर्वांत आधी याचा प्रयोग १९८९ मध्ये टीम बर्नर ली यांच्या सर्न प्रयोगशाळेत करण्यात आला होता.

टीम यांनी १९८० पासूनच या दिशेने काम करण्यास सुरुवात केली होती. सर्न प्रयोगशाळेत १९८४ मध्ये एक संशोधक म्हणून करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रयोगशाळेत अनेक कॉम्प्युटर्स होते. त्यावर विविध फॉरमॅटमध्ये माहिती जमा करण्यात आली होती. ही माहिती एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये योग्यरितीने सुरक्षित ठेवण्याचे काम टीमचे होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात ही सर्व माहिती एकत्र ठेवता येईल अशी सुविधा निर्माण करण्याची कल्पना आली. वर्ल्ड वाइड वेबच्या रुपात त्यांना याचे उत्तर मिळाले.

सुरुवातीला वर्ल्ड वाइड वेबचे अधिकार सर्नने आपल्याकडेच ठेवले होते. मात्र, नंतर १९९२ मध्ये प्रयोगशाळेबाहेर प्रसिद्ध करण्यात आले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९३ मध्ये संपूर्ण जगाला त्याचे अॅक्सेस मिळाले.

वर्ल्ड वाइड वेब म्हणजे.. या पेजमध्ये टेक्स्ट, फोटोज, व्हिडिओज आणि इतर मल्टिमीडिया आपल्याला पाहता येतात. या सर्वांना एकत्रित जोडण्यासाठी हायपरलिंकची मदत घेतली जाते. इंटरनेटवरुन या फाइल्स मिळवण्याची पद्धत म्हणजेच www आहे.