गुजरात सरकारने साहित्यिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा एक नवा उद्योग सुरू केला आहे. लेखकाच्या लेखनाची त्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपीच केली जाते. याप्रकारे गुजरात ही एक असहिष्णुतेची प्रयोगशाळाच होत आहे, असे खेदजनक उद्गार गुजरातचे भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी काढले.
समग्र विचारातून सर्वाचाच एक सम्यक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी ‘दक्षिणायन‘ अर्थातच दक्षिणेकडून असहिष्णुतेच्या विरोधातील विचाराच्या जागरासाठी गणेश देवी कोल्हापुरात आले होते. नवा देवल क्लब येथे ही चर्चा करण्यात आली.
दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येमुळे संतापलेल्या साहित्यिक जगताने आपल्याला मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून आपली नाराजी व्यक्त केली. याबाबत बोलताना देवी पुढे म्हणाले, शासनाने घटनेच्या आधारावर जबाबदारी सांभाळली. पण शास्त्रशुद्ध दृष्टिकोन वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा महत्त्वाचा धर्म आहे. अभिव्यक्तीची पूजा करणारे साहित्यिक वैचारिक मार्गावर टिकतात. याच्या रक्षणासाठी एकमेकाला समजून घेणे आवश्यक आहे.
यावेळी कवी संजीव खांडेकर, चित्रपट दिग्दर्शक परेश नायक, कवी प्रवीण बांदेकर, कवी अनिल जोशी, मनिष जानी, वीरधवल परब, गोिवद काजरेकर, गणेश विसपुते आदी साहित्यिकांनी पुरस्कार परत केले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2015 रोजी प्रकाशित
गुजरात असहिष्णुतेची प्रयोगशाळाच – गणेश देवी
गुजरात सरकारने साहित्यिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा एक नवा उद्योग सुरू केला आहे.
Written by रत्नाकर पवार
Updated:

First published on: 29-11-2015 at 00:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat is the laboratory for intolerance devi