08 March 2021

News Flash

CoronaVirus : कौतुकास्पद! हरभजनकडून ५००० कुटुंबांना अन्नदान

पत्नी गीता हिच्या साथीने करणार गरजु कुटुंबांना मदत

CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही लोक करोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. आफ्रिदीच्या संस्थेला मदत करा असे आवाहन केल्यामुळे हरभजन सिंगवर टीका केली जात होती, मात्र हरभजन सध्या एका चांगल्या गोष्टीमुळे चर्चेत आहे.

करोना आणि लॉकडाउन यामुळे भारतात विविध प्रकारची संकटे उभी राहिली आहेत. सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी PMCares Funds निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. पंजाबमधील जालंधरमध्ये असलेल्या गरीब आणि गरजू ५००० कुटुंबाला अन्नधान्य दान करण्याचे त्या दोघांनी ठरवले आहे. हरभजनने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच देवा आम्हाला हे सत्कार्य करण्यासाठी हिंमत आणि बळ दे अशी प्रार्थना देखील त्याने ट्विटमध्ये केली आहे.

आफ्रिदीच्या मुद्द्यावरून हरभजन ठरला होता टीकेचा धनी

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील बहुतांश लोकांचा रोजगार हा रोजंदारीवर असल्यामुळे लॉकडाउन करणं शक्य नसल्याचं पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. मात्र करोनाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला सध्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपली जबाबदारी ओळखत गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्याचे वाटप करत आहे. तो त्या संदर्भातील फोटो आणि अपडेटदेखील ट्विटरवरून साऱ्यांना देत आहे.

पाकिस्तानात तो जे सहकार्य करत आहे, त्या कामाची स्तुती करण्यात येत आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी फलंदाज युवराज सिंग यानेही त्याच्या कार्याची स्तुती केली. त्या दोघांनी ट्विट करत आफ्रिदी करत असलेल्या कामाचे कौतुक केले असून त्याला या कार्यात मदत करण्याचे आवाहन भारतीयांना केले. पण आफ्रिदीला मदत करण्याचा सल्ला देणं या दोघांना चांगलंच महागात पडलं. नेटिझन्सनी या दोघांना या प्रकारावरून फैलावर घेतल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 1:21 pm

Web Title: harbhajan singh and wife geeta to feed 5000 families who are in need in jalandhar amid coronavirus lockdown period vjb 91 2
Next Stories
1 युवराजची करोना विरोधातील लढाईत उडी; केली ५० लाखांची मदत
2 World Cup फायनलबाबत सचिन-सेहवागचा मोठा खुलासा
3 फॉर्म्युला-वनचा हंगाम रद्द करा!
Just Now!
X