29 September 2020

News Flash

आत्महत्येपूर्वी अ‍ॅटलास मालकाच्या पत्नीने चिठ्ठीत लिहिलं, ‘ते करायला नको होतं..पण ‘

चिठ्ठीत त्यांनी नवऱ्याला आणि मुलांना आपली काळजी घ्यायला सांगितली आहे.

प्रसिद्ध सायकल कंपनी अ‍ॅटलासचे सहमालक आणि प्रवर्तक संजय कपूर यांच्या पत्नीने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी नताशा यांनी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत नताशा यांनी “जे मी करायला नको होते, ते मी केलं. त्याची मला लाज वाटते” असे नताशा यांनी त्या चिठ्ठी मध्ये लिहीलं आहे.

“मी स्वत:च माझे आयुष्य संपवत आहे. कोणीही त्यासाठी जबाबदार नाही. मी असे काही केले आहे की, जे करायला नको होते. आज मला त्याबद्दल लाज वाटत आहे. मी तुमच्या सर्वांवर प्रेम करते. संजय, माझी मुलगी आणि मुलगा मी तुम्हाला सर्वांवर प्रेम करते” असे त्या चिठ्ठीत म्हटले आहे.

नवी दिल्लीत औरंगजेब मार्गावरील ल्युटयेन येथील घरामध्ये नताशा कपूर मंगळवारी मृतावस्थेत सापडल्या. बाथरुममधील पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त ईश सिंघल यांनी दिली.

या चिठ्ठीत त्यांनी नवऱ्याला आणि मुलांना आपली काळजी घ्यायला सांगितली आहे. आत्महत्येचे इतके टोकाचे पाऊल का उचलले ? ते अजून स्पष्ट झालेले नाही. कुटुंबाबरोबर आम्हाला या विषयावर बोलायचे आहे असे डीसीपीने सांगितले. पोलिसांना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या आत्महत्येबद्दल समजले.

खोली आतमधून बंद होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी, घरातील सदस्यांनी मृतदेह खाली उतरवला होता. नताशा कपूर यांना तात्काळ गंगाराम रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह नंतर राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवला. नताशा यांचा मृत्यू अनैसर्गिक असला तरी, पोलिसांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 5:34 pm

Web Title: have done something that i shouldnt have done wife of atlas cycles owner in suicide note dmp 82
Next Stories
1 प्रजासत्ताक दिनी लंडनमध्ये भारतीय संविधान जाळण्याचा पाकिस्तानचा कट
2 भारतात एक्स्प्रेस वे वर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
3 ‘JNU-जामिया’त पश्चिम युपीला १०% आरक्षण द्या, सर्वांचा ‘इलाज’ करतील – केंद्रीय मंत्री
Just Now!
X