आज ICSC आणि ISC बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल cise.org या संकेतस्थळावर क्लिक करुन पाहू शकतात. तिथे त्यांना त्यांचा परीक्षार्थी क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर ते एका क्लिकवर त्यांचा निकाल पाहू शकतात. ICSE बोर्डाने यासंदर्भात cise.org या वेबसाइटवर अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. यामध्ये निकाल जाहीर करण्याबाबत पूर्ण माहिती देण्यात आली आहे.

किती मुलांनी परीक्षा दिली होती?
ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला २ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये १ लाख १२ हजार ६६८ मुलं होती. तर ९५ हजार २३४ मुली होत्या. यापैकी २ लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १३७७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

ISC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला ८८ हजार ४०९ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ४७ हजार ४२९ मुलांचा समावेश होता. तर ४० हजार ९८० मुलींचा समावेश होता. यापैकी ८५ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर २७९८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.