केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी अनलॉक 1.0 संदर्भात मार्गदर्शकतत्वे जारी केली. त्यावेळी देशांतर्गत रस्ते मार्गाने होणाऱ्या प्रवासासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूक तसेच नागरी प्रवासावर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.

दोन राज्यांमध्ये तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची तसेच ई-परमिट बाळगण्याची आवश्यकता नाही. पण राज्य सरकार अटी घालू शकते.

“राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि परिस्थितीच्या आधारावर वाहतुकीवर काही निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना त्या संदर्भात आगाऊ माहिती जाहीर करावी लागेल तसेच सर्व प्रक्रियांचे पालन करावे लागेल” असे आदेशात म्हटले आहे.