03 March 2021

News Flash

London Bridge Terror Attack : लंडनमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, सहा जणांचा मृत्यू

लंडनमध्ये शनिवारी रात्री दोन ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र

लंडनमध्ये शनिवारी रात्री दोन ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन हल्लेखोरांचा खात्मा झाला आहे. हल्ल्यात ३० हून अधिक जण जखमी झाले असून जखमींना शहरातील तीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर लंडनमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री हल्लेखोरांनी लंडन ब्रीजवर भरधाव गाडी चालवून पादचारी मार्गावरील लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी  बरो मार्केटमध्ये जाऊन नागरिकांवर चाकूहल्ला केला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी झाले आणि त्यांच्या कारवाई तिन्ही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आलाे. पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर लंडनमधील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. या दोन्ही घटनांनंतर लंडन ब्रीज आणि बरो मार्केट रिकामे करण्यात आले असून, तेथे मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमधील मॅंचेस्टरमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर परत हा हल्ला झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हल्ल्याचा निषेध केला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याच्या तपासात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 6:36 am

Web Title: london bridge terror attack vehicle rampage in one area stabbing in borough market 7 feared dead live updates
Next Stories
1 सोन्यावर तीन टक्के ‘जीएसटी’
2 लक्ष्यभेदी कारवाईनंतर घुसखोरीत ४५ टक्के घट
3 अंटार्क्टिकामधील हिमपर्वताचे विभाजन
Just Now!
X