24 October 2020

News Flash

एकाकी गाढवासाठी गावकऱ्यांनी शोधली ‘वधू’… अन् लावले लग्न

अजब लग्नाची गजब गोष्ट

कर्नाटकमधील हुरा गावांत एक अजब लग्न पहायाला मिळाले. येथे ‘वधू’ लाजत नव्हती मात्र, लाथा मारत होती. दुसऱ्या गावांतून आलेली ‘वधू’ घाबरलेली होती. दुसरीकडे पाहुण्यांना एक मोठी समस्या होती चार वर्षाचा ‘वर’ हिंसक होता. चार वर्षाच्या ‘वर’ला हिंसकपणे चावा घेण्याची सवय आहे. त्याची ही सवय मोडावी म्हणूनच गावकऱ्यांनी त्याचे लग्न लावले आहे.

हा चार वर्षाचा ‘वर’ हुरा गावातील गाढव आहे. या गाढवासाबोत असलेल्या गाढविणीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून गाढवाचे संतुलन बिघडले होते. पण आता हुरा गावातील लोकांनी त्याला जिवनसाथी मिळवून दिली आहे. गावकऱ्यांनी या एकाकी असलेल्या गाढवाचे विधीपुर्वक लग्न लावले. लग्नानंतर गावकऱ्यांनी मिठाईही वाटली. या लग्नामध्ये गाढवाने मंगळसुत्र बांधले. यावेळी दोघांना नवी कपडे घालून लग्नातील वधू-वराप्रमाणे सजवण्यात आले होते.

जुलैमध्ये बिबट्याच्या हल्यात गाढवाच्या साथीदाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा गाढव आक्रमक झाला होता. तेंव्हापासून दिसेल त्याच्या अंगावर जाणे, चावणे अशा गोष्टी गाढव करत होता. साथीदाराच्या मृत्यूपूर्वी गाढवाचे वागणे ठिक होते असे गावकरी सांगतात.

हुरा गावातील लोकांनी चमराजनगर येथे गाढवासाठी गाढवीण शोधली. गावकऱ्यांनी गाढविणीच्या मालकाला विचारल्यावर त्यांनीही लगेच होकार दिला. लोक गाढविणीसाठी पैसे जमवत होते. पण चमराजनगरच्या व्यक्तीने गाढवीणसाठी एकही पैसा घेतला नाही. जमा झालेल्या पैशातून गावकऱ्यांनी दोघांचे रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 1:30 pm

Web Title: mysuru villagers find lonely donkey a bride
Next Stories
1 तेलंगणा ऑनर किलिंग: प्रणय-अमृताचा पोस्ट वेडिंग व्हिडीओ झाला व्हायरल
2 बापरे! पाच हजार किलो वांग्याच्या भरीतासाठी केवढी लागेल कढई? ..बघाच!
3 शेवटी ती आईच…पिल्लांना वाचवण्यासाठी कोब्रा सापाशी भिडली कुत्री
Just Now!
X