भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी पणजीतील सभेत माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यावर टीका केली आहे. त्याला नटराजन यांनी चोख उत्तर दिले आहे. गुजरातमधील पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या प्रकल्पांना आपण खंबीरपणे विरोध केला. मोदींच्या टीकेने आपण घाबरणार नाही, असे नटराजन यांनी स्पष्ट केले.
गुजरात सरकारने पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात विनाश केला. त्यानंतरही ते आपल्यावर व्यक्तिगत आरोप करत आहेत हे चुकीचे आहे. मोदींनी पणजीतील सभेत ‘जयंती कर’ असा उल्लेख केला होता. पैशाशिवाय एकही फाइल हलत नाही, असा आरोप मोदींनी केला होता. मोदींच्या आरोपाने आपण विचलित होणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले. तीन आठवडय़ांपूर्वी नटराजन यांना हटवल्यानंतर पर्यावरण मंत्रालय वीरप्पा मोईली यांच्याकडे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘मोदींच्या आरोपांनी घाबरणार नाही’
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी पणजीतील सभेत माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यावर टीका केली आहे.

First published on: 14-01-2014 at 04:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi cant intimidate me into silence jayanthi natrajan