02 March 2021

News Flash

‘परीक्षा पे चर्चा 2.0’: स्वप्नं, अपेक्षा असाव्यात मात्र त्यांचा तणाव नको- पंतप्रधान मोदी

परीक्षा सर्वस्व नाहीत. एक किंवा दोन परीक्षेत अपयशी ठरल्याने जीवन अपयशी ठरत नाही

परीक्षाच सर्व काही नाही. एक किंवा दोन परीक्षेत अपयशी ठरल्याने जीवन अपयशी ठरत नाही, असे सांगत स्वप्न, अपेक्षा असाव्यात मात्र त्यांचा तणाव नसावा. तंत्रज्ञानाचा उपयोग आपले सामर्थ्य वाढीसाठी करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

परीक्षा सर्वस्व नाहीत. एक किंवा दोन परीक्षेत अपयशी ठरल्याने जीवन अपयशी ठरत नाही, असे सांगत स्वप्न, अपेक्षा असाव्यात मात्र त्यांचा तणाव नसावा. तंत्रज्ञानाचा उपयोग आपले सामर्थ्य वाढीसाठी करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘परीक्षा पे चर्चा २.०’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील २४ राज्यातील विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी विविध १६ देशातील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला.  परीक्षेसाठी मोदींनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. प्रारंभी त्यांनी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी..

– दबावात येऊन निर्णय घेऊ नका. आपल्या क्षमतेच्या हिशोबाने विचार करा, यासाठी एखाद्याची मदतही घ्या

– जे लोक यशस्वी असतात. त्यांच्यावर वेळेचा दबाव नसतो. त्यांना वेळेची किंमत कळलेली असते. त्यामुळे त्यांच्यावर दबाव नसतो.

– कुछ खिलौनों के टूटने से बचपन नहीं मरा करता है, ही कविता पंतप्रधान मोदींनी मुलांना ऐकवली

– निराशेत बुडालेला समाज कुणाचं भलं करू शकत नाही

– प्रगतीपुस्तक सर्वांत मोठी समस्या, असल्याचे पंतप्रधान म्हणाले

– पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये

– तुलना केल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होते

– येणाऱ्या परीक्षेकडे संधी म्हणून पाहा

– आयुष्यातील प्रत्येक क्षण कसोटीचा

– मुलांच्या चुका प्रेमानं सुधारण्यावर भर द्या

–  मुलांना ताण दिला तर परिस्थिती बिघडेल

– पालकांनी विद्यार्थ्यांशी तंत्रज्ञानासंबंधी चर्चा करावी

– तंत्रज्ञानाचा उपयोग विकासासाठी व्हावा

– आपलं ध्येय कायम मोठं असावं

– परीक्षेच्या पलीकडेही खूप मोठं जग

– पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:01 pm

Web Title: pariksha pe charcha 2 0 how to do deal with expectations of nation student asks pm modi
Next Stories
1 ‘नवज्योतसिंग सिद्धू, नसीरूद्दीन शाह आणि आमिर खान हे गद्दार’
2 जॉर्ज फर्नांडिस.. असामान्य नेत्याच्या सामान्य गोष्टी
3 शीख, साधूबाबा आणि बडोदा डायनामाइट खटला; आणबाणीच्या काळातील जॉर्ज फर्नांडिस यांचा लढा
Just Now!
X