स्वदेशी तंत्रज्ञानाने अणुभट्टी विकसित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतीय अणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. गुजरातमधील काकरापार अणु ऊर्जा प्रकल्पाच्या प्लांट-३ साठी ही अणु भट्टी विकसित करण्यात आली आहे.

“अत्यंत कठीण अशा काकरापार अणू ऊर्जा प्रकल्प प्लांट-३ साठी आपल्या अणू शास्त्रज्ञांचे अभिनंदन. स्वदेशी तंत्रज्ञानाने ७०० मॅगावॅट केएपीपी-३ रिअ‍ॅक्टरची निर्मिती करण्यात आली आहे. मेक इन इंडियाचे हे चमकदार उदहारण आहे” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

सूरतपासून ८० किलोमीटर अंतरावर ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर हा काकरापार अणू ऊर्जा प्रकल्प आहे. KAPP-3 आणि ४ मार्क पाच कॅटेगरीचे हेवी रिअ‍ॅक्टर आहेत. नव्या रिअ‍ॅक्टरर्समध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेही नवी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.