18 February 2020

News Flash

नरेंद्र मोदींकडून इफ्तार पार्टी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत श्रीनगर येथे इफ्तार पार्टी देणार असल्याचे वृत्त आहे.

| July 8, 2015 11:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत श्रीनगर येथे इफ्तार पार्टी देणार असल्याचे वृत्त आहे. येत्या 17 जुलै रोजी एका कार्यक्रमानिमित्त मोदी जम्मूला जाणार आहेत, त्यानंतर इफ्तार पार्टीसाठी श्रीनगर येथे जाणार असल्याचे समजते. रमजानच्या दिवसांत मुस्लिम बांधवांकडून अशाप्रकारच्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. हेच निमित्त साधून रमजान ईदच्या आदल्यादिवशी मोदी श्रीनगरमध्ये ही इफ्तार पार्टी देणार असल्याचे समजते. गेल्यावर्षी ऐन दिवाळीत काश्मीरमध्ये आलेल्या प्रलयंकारी पुरानंतर नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये काही दिवस व्यतित केले होते. गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे भाजपच्या हिंदुत्ववादी प्रतिमेविषयी टीकेचा सूर उमटताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचे हे पाऊल महत्त्वपूर्ण राजकीय खेळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on July 8, 2015 11:08 am

Web Title: pm narendra modi likely to host iftar party in srinagar on july 17
टॅग Iftar Party
Next Stories
1 दहशतवादी हाफिज सईदची संघटना ‘समाजसेवी’!
2 ‘पद्म’साठी वसुंधराराजे यांनी ललित मोदींच्या नावाची शिफारस केली होती
3 इस्लाम धर्मातील कट्टर विचारसरणीचा देशाला धोका- स्वयंसेवक संघ
Just Now!
X