10 August 2020

News Flash

मोदींच्या वाढदिवसासाठी जिल्हाधिकाऱ्यांची गुजरात सरकारकडे ८० लाखांची मागणी

छुप्या पद्धतीने आखला कार्यक्रम

संग्रहित छायाचित्र

गुजरात सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छुप्या पद्धतीने कार्यक्रम आखल्याची चर्चा आहे. वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वडोदराच्या ‘डबोही’ येथे १७ सप्टेंबर रोजी ही रॅली पार पडणार आहे. मोदींच्या उपस्थितीमुळे या रॅलीत लोक मोठ्या संख्येने सहभागी होईल, असा अंदाज आहे. तसेच सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच अनेक प्रसिद्ध व्यक्ती या रॅलीत भाग घेणार आहेत. त्यामुळे व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या भोजनासाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला आहे. हा सर्व खर्च तब्बल ८० लाखांच्या घरात जात आहे . जिल्हाधिकारी भारती यांनी सरकारी विभागाला पाठवलेल्या पत्रात, १७ सप्टेंबरला नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे म्हटले आहे. १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांचाही वाढदिवस असतो.

दरम्यान, मोदींच्या या रॅलीसाठी विविध जिल्ह्यांमधून दीड लाख लोक येणार येतील. या लोकांना राज्य परिवहन विभागाच्या १८०० बसेसमधून येथे आणण्यात येईल. हा सगळा जिल्हा प्रशासनाला खर्च उचलावा लागणार आहे. प्रत्येकासाठी अन्नाची पाकीटे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

यासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी भारती यांना विचारणी केली असता त्यांनी आम्ही केवळ सरकारला निधी देण्याची विनंती केल्याचे सांगितले. गुजरामध्ये वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहेत. सध्या गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2017 4:25 pm

Web Title: pm narendra modi rally gujrat vadodara dabhoi collector seeks rs 80 lakh from ssnnl
Next Stories
1 पहिल्याच दिवशी लखनऊ मेट्रो ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे १०० प्रवासी मेटाकुटीला
2 सोनिया गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील एसपीजी कमांडो बेपत्ता
3 गौरी लंकेश हत्या प्रकरणाची SIT चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश
Just Now!
X