24 November 2020

News Flash

नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागतम्

राफेल भारताचे नवे घातक अस्त्र

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत राफेल फायटर विमानांचे अखेर भारतामध्ये लँडिंग झाले आहे. अंबाला एअर बेसवर ही विमाने बुधवारी दुपारी सुरक्षित उतरली. बऱ्याच काळापासून या विमानांची चर्चा होती. या फायटर विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे बळ कैकपटीने वाढले आहे. ही विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा टि्वट केले आहे. मोदींनी राफेल विमानांच्या स्वागतासंदर्भात संस्कृतमध्ये एक श्लोक टि्वट केला आहे.

आणखी वाचा- चीनच्या स्टेल्थ J-20, पाकच्या F-16 पेक्षा राफेलच सरस, कसं ते समजून घ्या…

२०१६ साली नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार झाला. २०१९ लोकसभा निवडणुकीच्याआधी काँग्रेसने या मुद्दावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राफेलच्या खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झालाय, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पण न्यायालयाकडून सरकारला क्लीन चीट मिळाली. विरोधकांना भ्रष्टाचार झाल्याचे कुठेही सिद्ध करता आले नाही.

आणखी वाचा- …तर पाकिस्तानच्या F16 चा खात्मा होणारच, जाणून घ्या ‘राफेल’मधील ‘मिटिऑर’ची वैशिष्ट्ये

आज या विमानाच्या आगमनानंतर काँग्रेसनं स्वागत केलं आहे. तसेच हवाई दलाच्या जवानांच अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर देशवासीयांना सरकारला काही प्रश्न विचारण्याचं आवाहनही केलं आहे.

आणखी वाचा- हॅमर! चीनला जबर तडाखा देऊ शकतो राफेलमधला ‘हा’ स्मार्ट बॉम्ब

दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा पक्षी सुरक्षित उतरले असे टि्वट केले. “राफेल विमानांचे भारतात दाखल होणे ही लष्करी इतिहासातील नव्या युगाची सुरुवात आहे. या बहुउपयोगी विमानामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 4:33 pm

Web Title: pm narendra modi wlecome rafael in india dmp 82
Next Stories
1 गुजरात : ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बाळगाणाऱ्या दोघांना अटक, ४ कोटींपेक्षा जास्त रक्कम जप्त
2 पक्षी सुरक्षित उतरले, एअर फोर्सला योग्य वेळी बळ मिळाले – राजनाथ सिंह
3 “पक्षश्रेष्ठींची माफी मागून पुन्हा पक्षात येऊ शकता”, बंडखोर आमदारांना अशोक गेहलोत यांची ऑफर
Just Now!
X