अॅटलस सायकल लहानापासून वृद्धांपर्यतं सर्वांना माहित आहे. देशात सायकल म्हटले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अॅटलस नाव येतेचय देशातील सर्वसामान्यांपर्यंत हा ब्रँड पोहचला आहे. पण.. सायकल तयार करणारी प्रसिद्ध कंपनी आर्थिक संकटात आहे. जागतिक सायकल दिनी एकीकडे लोक सायकल चालवण्यासाठी प्रमोशन करत असताना गाजियाबादमध्ये सायकलच्या फॅक्टरीला कुलूप ठोकलं आहे. येथे काम करणारे हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार झाले आहेत.
देशातील सायकल कंपनी अॅटलसने उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे असणारा कारखाना बंद केला आहे. कंपनीकडून येथील कामगारांना नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये सायकल कारखान्याच्या मालकाकडे आर्थिक तंगी असल्यामुळे कारखाना बंद करत असल्याचे सांगण्यात आले आहे. सायकल दिनाच्या दिवशीच सायकल तयार करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करत याबद्दल नाराजी व्यक्त करत सरकारला प्रश्न विचारला आहे.
कल विश्व सायकिल दिवस के मौके पर सायकिल कम्पनी एटलस की गाजियाबाद फैक्ट्री बंद हो गई। 1000 से ज्यादा लोग एक झटके में बेरोजगार हो गए।
सरकार के प्रचार में तो सुन लिया कि इतने का पैकेज, इतने MoU, इतने रोजगार। लेकिन असल में तो रोजगार खत्म हो रहे हैं, फैक्ट्रियां बंद हो रही हैं।..1/2 pic.twitter.com/Zuzp3Y2jUE— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 4, 2020
जागतिक सायकल दिनाच्या दिवशीच अॅटलास सायकलची गाजियाबादमधील फॅक्ट्री बंद झाली आहे. त्यामुळे एक हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार झाले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पैसे दिल्याचं ऐकलं पण खरं तर कंपन्या बंद होत आहेत. लोकांचा रोजगार वाचवण्यासाठी सरकारने आपल्या योजना आणि धोरणांमध्ये बदल करावा.. असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.