१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर न्यायमूर्ती बी. एम. श्रीकृष्ण यांनी कायद्यामुळे योग्य तो न्याय झाला असल्याचे सांगताना दंगलप्रकरणीही अशाच प्रकारे तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे न्यायमूर्ती श्रीकृष्ण प्रमुख होते.
बॉम्बस्फोट आणि दंगल प्रकरणांच्या निकालाबाबत न्या. श्रीकृष्ण म्हणाले की, भारतात वारंवार घडणारे दहशतवाद ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच, जातीय दंगलींमुळेही भारतातील परिस्थिती चिघळलेली आहे. श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीच्या वतीने डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ या कालावधीत दंगलींचा अभ्यास केला होता.