News Flash

सर्वात लहान दिवा तयार करण्यात यश

जगातील सर्वात लहान दिवा तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले असून, तो ग्राफिनच्या एका अणूइतक्या जाडीचा आहे.

| June 17, 2015 01:33 am

जगातील सर्वात लहान दिवा तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले असून, तो ग्राफिनच्या एका अणूइतक्या जाडीचा आहे. त्यामुळे ग्राफिन आता स्मार्टफोन, संगणक , मोटारी व इमारती तसेच उपग्रह यांचे रूप बदलून टाकणार आहे.
अतिशय पातळ अशा ग्राफिनच्या थरापासून अतितप्त होऊ शकणारे आपल्या नेहमीच्या बल्बमध्ये असते तसे तारेचे वेटोळे तयार करण्यात आले आहे. ते २५०० अंश सेल्सियस तापमानाला प्रकाशमान होते. आण्विक पातळीवर असला तर या बल्बचा प्रकाश नुसत्या डोळ्यांनी दिसतो इतका प्रखर आहे. ज्या सिलिकॉन चिपवर तो बसवलेला असतो तिचे कुठलेही नुकसान या जास्त तापमानामुळे होत नाही. नवीन प्रकारची स्वीच, प्रकाशीय संगणक, डिजिटिल माहितीचे वहन यात त्याचा उपयोग होणार आहे. माहितीचे वहन सिलिकॉन चिपपेक्षा वेगाने होईल असा वैज्ञानिकांचा दावा आहे.
न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक जेम्स होन यांनी सांगितले की, संगणकाच्या चिपवर प्रथमच प्रकाशस्त्रोत तयार करण्यात आला आहे. हे संशोधन ‘नेचर नॅनोटेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. होन यांच्या दाव्यानुसार जगातील सर्वात लहान विद्युत बल्ब तयार करण्यात त्यांना यश आले असून, यात नवीन प्रकारचा ब्रॉडबँड प्रकाश उत्सर्जक वापरण्यात आला आहे. त्यामुळे अणुएवढय़ा जाडीच्या लवचिक पदार्थातून प्रकाश मिळवता आला आहे. त्याचा संदेश वहनात मोठा उपयोग होईल. ग्राफिन हा पदार्थ रशियन वैज्ञानिकांनी मँचेस्टर विद्यापीठात शोधून काढला होता व तो कार्बनच्या जाळ्यासारख्या रचनेचा बनलेला असतो. त्याची जाडी एका अणूएवढी असते तो खूपच हलका आणि विजेचा तो पूर्णवाहक असतो.

ग्राफिनचे उपयोग
* पिण्याचे पाणी- खारे पाणी गोडे करण्याच्या तंत्रात ग्राफिनच्या स्फटिकांची जाळी वापली जाते त्यामुळे मीठ गाळून पेय जल बाहेर पडते.
* स्मार्टफोन- ग्राफिन हे पारदर्शक व संवाहक असल्याने त्याचा उपयोग स्मार्टफोनचे टचस्क्रीन तयार करण्यासाठी होतो.
* न गंजणाऱ्या मोटारी- मोटारीत धातू वापरला जातो पण त्या ऐवजी ग्राफिनचा वापर केला तर तो जलरोधक असतो ऑक्सिडेशनची क्रिया रोखली जाते, त्यामुळे गंज चढत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2015 1:33 am

Web Title: scientist successfully creates the most small lamp
टॅग : Scientist
Next Stories
1 ग्रीन पीस इंडिया संस्थेत लैंगिक अत्याचार
2 अमेरिकेत शीख युवकाच्या न्यायालयीन लढाईस यश
3 अल-कायदाचा कमांडर ड्रोन हल्ल्यात ठार
Just Now!
X