भारतीय सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार झाला नाही असं स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं आहे. एवढंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं वृत्तही खोटं असल्याचं भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल (ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी सांगितलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. या वृत्ताला काहीही अर्थ नाही हे वृत्त खोटं आहे असं परमजित सिंग यांनी म्हटलं आहे.

 

काही प्रसारमाध्यमांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं आणि पिन पॉइंट स्ट्राइक केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र असं काहीही घडलं नसल्याचं आता भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर पिनपॉइंट स्ट्राइक करण्यात येतो आहे. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी कट रचला जातो आहे त्यामुळे ही कारवाई केल्याचं म्हणण्यात आलं होतं मात्र असं काहीही घडलं नसल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

अनेक प्रसारमाध्यमांनी आणि वृत्त संकेतस्थळांनी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक केल्याचं आणि पिनपॉइंट स्ट्राइक करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं वृत्त दिलं. यासाठी पीटीआय या वृत्तसंस्थेचाही हवाला देण्यात आला. मात्र प्रत्यक्षात असा कोणताही एअरस्ट्राइक किंवा कोणताही गोळीबार झाला नसल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे.