News Flash

जम्मू-काश्मीर : शोपियाँमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले आहे. 

जम्मू-काश्मीर : शोपियाँमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू-काश्मीरच्या शोपियाँमध्ये सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या ठिकाणी दुपारपर्यंत चकमक सुरुच होती.

काश्मीरचे पोलीस अधिकारी एस. पी. पानी म्हणाले, या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 12:04 pm

Web Title: two terrorists have been killed by security forces in shopian at jammu and kashmir
Next Stories
1 मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादाला तर घाबरता; नवाब मलिकांचा पलटवार
2 पार्थसाठी उदयनराजे भोसले मैदानात; आज संध्याकाळी निगडीत जाहीर सभा
3 अशोक चव्हाणांचा ‘तो’ धक्कादायक पराभव; ३० वर्षांनंतर प्रतिस्पर्ध्याकडून कथन
Just Now!
X