भारतीय सेनेचे लेफ्टनंट जनरल एसके सैनी (जीओसी, दक्षिण कमांड) यांनी भारताच्या दक्षिण भागावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची शक्यता वर्तवली आहे.

लेफ्टनंट जनरल सैनी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सर क्रीक भागातून काही रिकाम्या सोडून देण्यात आलेल्या संशयित अवस्थेतील बोटी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती दिली. दक्षिण भारतात दहशतवादी हल्ला घडण्याची शक्यता असल्याचेही यावेळी ते म्हणाले. तर आम्ही दहशतवादी कारवायांना उलथवून लावण्यासाठी सज्ज असल्याचेही, त्यांनी यावेळी सांगितले.

केरळचे पोलीस महासंचालक लोकनात बहेरा यांनी या प्रकरणी म्हटले आहे की, भारतीय सेनेकडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचेही आदेश दिले गेले आहेत.