मुंबई येथील हिरे उद्योग आस्थापनाने मुस्लीम असल्याने नोकरी नाकारलेल्या झीशान खान याला अहमदाबाद येथील अदानी समूहाने नोकरी दिली आहे.
खान (२२) याने सांगितले, की धार्मिक भेदभावाचे वृत्त येताच आपल्याला नोकरीसाठी अनेक प्रस्ताव आले आपला मेल बॉक्स संदेशांनी भरून गेला, त्यात अदानी समूहाचा नोकरीचा प्रस्ताव होता.
खान हा आता अदाानी समूहाच्या मुंबई कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून रुजू होणार आहे. अदानी समूहाचा प्रस्ताव का स्वीकारला असे विचारले असता त्याने सांगितले, की देशातील एकात्मिक स्वरूपाच तो मोठा उद्योग आहे. अदानी समूहाच्या प्रवक्तयाने सांगितले, की आम्हाला हुशार माणसे हवी आहेत आम्ही जात, धर्म, वंश बघत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2015 रोजी प्रकाशित
‘त्या’ मुस्लीम तरुणाला अदानी समूहाकडून नोकरी
मुंबई येथील हिरे उद्योग आस्थापनाने मुस्लीम असल्याने नोकरी नाकारलेल्या झीशान खान याला अहमदाबाद येथील अदानी समूहाने नोकरी दिली आहे. खान (२२) याने सांगितले, की धार्मिक भेदभावाचे वृत्त येताच आपल्याला नोकरीसाठी अनेक प्रस्ताव आले आपला मेल बॉक्स संदेशांनी भरून गेला, त्यात अदानी …
First published on: 01-06-2015 at 04:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zeeshan khan denied a job for being a muslim hired by adani group