Delhi Schools Receive Bomb Threat: राजधानी दिल्लीतील सहा शाळांना शुक्रवारी पहाटे ई-मेलद्वारे बॉम्बच्या बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दलची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. या धमक्यांमुळे पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा परिसरात शोध मोहिम सुरू केली.

ई-मेलद्वारे धमकी मिळालेल्या शाळांमध्ये डीपीएस ईस्ट ऑफ कैलास, सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूल या शाळांचा समावेश आहे. ९ डिसेंबर रोजीदेखील जवळपास ४० शाळांना अशीच धमकी दिली होती.

पश्चिम विहार भाटनगर इंटरनॅशनल स्कूल, श्री निवास पुरी येथील केंब्रिज स्कूल आणि कैलाश पूर्व येथील डीपीएस अमर कॉलनी या शाळांमधून धमकीच्या ईमेलबाबत फोन आल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍याने वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना दिली. तसेच अग्निशमन विभाग, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके, श्वान पथकांसह या शाळांमध्ये पोहोचले आहेत आणि तपासणी करत आहेत असेही त्यांनी सांगितले.

गेल्या आठ महिन्यात दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या संस्थांना ज्यामध्ये शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि विमानतळ याचा समावेश आहे यांना बॉम्बच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत, पण तपासानंतर या शेवटी खोट्या असल्याचे समोर आले आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

या धमक्यांबद्दल बोलताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “आठवडाभरात दुसर्‍यांदा दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे, हे अत्यंत गंभीर असून काळजी वाढवणारं आहे. हे असंच सुरू राहिले तर याचा किती वाईट परिणाम मुलांवर होईल? त्यांच्या शिक्षणाचे काय होईल?”

हेही वाचा>> D Gukesh : गुकेशच्या जगज्जेतेपदाचं धोनी कनेक्शन! क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या प्रशिक्षकाने केली मदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आप’ने दिल्लीत गुन्हेगारी शिखरावर पोहचली हे असा दावा कर केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. “अमित शाह आता तरी जागे व्हा. दिल्लीत सध्या गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. दररोज शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या येत आहेत. धमक्या देणाऱ्यांनाही माहिती आहे की, गृहमंत्री अमित शाह झोपले आहेत. त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही,” अशी पोस्ट आपने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.