भारतीय वंशाची तमिळ चित्रपट अभिनेत्री अकिला नारायणन अमेरिकेच्या सशस्त्र दलात सामील झाली आहे. अकिला नारायणन यांनी अमेरिकन सैन्यात वकील म्हणून रुजू झाल्या आहेत. गेल्या वर्षी दिग्दर्शक अरुलच्या ‘कदमपरी’ या हॉरर थ्रिलरमधून तमिळमध्ये पदार्पण करणारी अकिला नारायणन आता अमेरिकी आर्मीमध्ये भरती झाली आहे.

सशस्त्र दलात प्रवेश करण्यासाठी अकिलाला अमेरिकी लष्कराचे कठोर लढाऊ प्रशिक्षणही घ्यावं लागलं आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच ती अमेरिकी सैन्यात वकील म्हणून रुजू झाली.अमेरिकेत राहणार्‍या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीने २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘कादमपरी’ चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पृथ्वीने या चित्रपटाला संगीत दिले असून व्ही.टी.के. उत्थयन यांनी छायांकन केले. हा चित्रपट सामाजिक संकल्पनेवर आधारित होता.


विशेष म्हणजे अकिला ‘नाइटिंगेल स्कूल ऑफ म्युझिक’ नावाची ऑनलाइन म्युझिक स्कूलही चालवत आहे. यामध्ये ती अनेकांना तिच्याकडे असलेली संगीताची कला शिकवते. याशिवाय तरुण समाजाला प्रेरणा देण्यासाठी अकिला समाजात फिरत आहे.अकिला नारायणन अमेरिकी लष्करी कर्मचाऱ्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहतील. ती देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाली आहे. अनेकांनी त्यांच्या सेवेचे कौतुक केले असून त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


अकिला नारायणन व्यतिरिक्त, सुमती नारायणन, नारायणन नरसिंगम, ऐश्वर्या नारायणन, सहगर कुंदावदिवेलू, उमा सेहगर, आदित्य सेहगर, अरविंद सेहगर यांसारखे त्यांचे कुटुंबीय अभिमानाने स्वत:ला लष्करी कुटुंब म्हणतात आणि अमेरिकन सैन्याची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य मानतात.