दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने काल चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना आज राऊस एव्हेन्यू जिल्हा न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना २८ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. कालपासून ‘आप’चे कार्यकर्ते देशभरातील विविध राज्यांमध्ये आंदोलन करत होते. आज अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनीदेखील आपल्या पतीच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. केजरीवाल हे नेहमीच दिल्लीतील जनतेच्या पाठिशी उभे राहिलो होते. त्यांची अटक करून इथल्या जनतेला फसविण्यात आले आहे.

सुनीता केजरीवाल यांनी एक्स अकाऊंटवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, अरविंद केजरीवाल तुरुंगात असो किंवा बाहेर, त्यांचे आयुष्य देशासाठी आणि मातृभूमीसाठी समर्पित केलेले आहे. लोकांनाही याची पूर्ण कल्पना आहे. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी अंहकारातून चिरडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना मद्य गैरव्यवहारप्रकरणी २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी

मोदींना सत्तेचा अहंकार

“मोदीजींनी तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला अटक करून सत्तेचा अहंकार दाखवून दिला आहे. ते प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कारवाई दिल्लीच्या जनतेशी केलेली प्रतारणा आहे. दिल्लीच्या जनतेसाठी त्यांचे मुख्यमंत्री कायम सोबत राहिले होते. ते तुरुंगात असो किंवा बाहेर असो, त्यांनी स्वतःचे आयुष्य देश आणि मातृभूमीसाठी समर्पित केले आहे. जनतेलाही हे माहीत आहे. जय हिंद”, अशी पोस्ट सुनीता अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर टाकली.

केजरीवाल यांची अटक कशासाठी?

करोना काळात दिल्ली सरकारने नवे अबकारी धोरण लागू केले होते. हे धोरण तयार करत असताना प्रशासनाला विश्वासात घेतले नाही, तसेच या धोरणामुळे सरकारच्या कोट्यवधी महसूलावार पाणी सोडावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आधी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आले होते. सिसोदिया एक वर्षांपासून तुरुंगात आहेत. काही ठराविक मद्य व्यापाऱ्यांना नफा मिळवून देण्यासाठी अबकारी धोरण तयार करण्यात आले, त्याबदल्यात आम आदमी पक्षाला १०० कोटींची लाच मिळाल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण काय आहे? ‘आप’ नेत्यांवर ईडीने कोणते आरोप केले आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार के. कविता यांनाही अटक करण्यात आले आहे. के. कविता यांनी मद्य धोरण लागू करण्यात यावे, यासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता मुख्य आरोपी म्हणून सादर करण्यात येत आहे.