इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचे प्रमुख मौलाना तौकीर खान यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. मोदी सरकारने लालकृष्ण आडवाणींसारख्या मानवतेच्या मारेकऱ्याला भारतरत्न पुरस्कार दिला असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच बाबरी शहीद झाल्यानंतर आणखी तीन हजार मशिदींची यादी तयार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाले मौलाना तौकीर रजा?

“बाबरी मशीद शहीद करण्यात आली. आता आणखी तीन हजार मशिदींची यादी तयार करण्यात आली आहे. ASi, न्यायालय आणि सरकार यांच्यावर विश्वासच उरलेला नाही. देशातल्या मशिदींवर रोज बुलडोझर चालवण्यात येतो आहे. ज्ञानवापीची परिस्थिती काय आहे ते तुमच्यासमोर आहेच. मात्र अशा अनेक मशिदी तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्या देशातला कायदा बदनाम होतो आहे.” असा आरोप तौकीर रजा खान यांनी पत्रकार परिषदेत केला.

तीन हजार मशिदींची यादी तयार

यानंतर ते म्हणाले “बाबरी मशीद शहीद करण्यात आली. मात्र ज्ञानवापी मशीद शहीद होऊ देणार नाही. कारण बाबरीच्या बाबतीत जे झालं तशीच बेईमानी आत्ताही केली जाते आहे. बाबरी आणि ज्ञानवापी यांच्यासह तीन हजार मशिदींची यादी तयार करण्यात आली आहे.” असाही गंभीर आरोप तौकीर रजा खान यांनी केला.

हे पण वाचा- “बाबरी मशीद पडली, त्यावेळी मी त्‍याच ठिकाणी होतो, याचा मला अभिमान,”, देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, “लाठ्या, गोळ्याही खाल्‍ल्‍या…”

मुस्लीम तरुण घाबरत नाहीत. फक्त तोच मुस्लीम घाबरतो जो अल्लाहला मानत नाही. आज घडीला मुस्लीम लोक शांत आहेत, आमच्या सहनशीलतेमुळे देशात यादवी माजलेली नाही. आमच्या तरुणांचा संयम सुटला तर मात्र यादवी माजेल यात काहीही शंका नाही असा इशाही तौकीर रजा खान यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लालकृष्ण आडवाणींवर टीका

लालकृष्ण आडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. केंद्र सरकारच्या या निर्णयावरही तौकीर रजा खान यांनी टीका केली. सरकारने मानवतेच्या मारेकऱ्याला हा पुरस्कार दिल्याची टीका त्यांनी केली आहे. लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देणं हा भारतरत्न पुरस्कराचा अपमान आहे. बेईमानी, स्वार्थीपणा यांचा उदय झाला आहे. बेरोजगारी वाढते आहे. या सगळ्यांसाठी लालकृष्ण आडवाणी जबाबदार आहे. त्यांना देशात दुही माजवण्यासाठी हा पुरस्कार दिला जात असेल त मी त्यांचं अभिनंदन करतो असा टोला तौकीर यांनी लगावला आहे.