पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भ्रष्टाचारावरून विरोधी पक्षावर क्षरसंधान साधलं. काही पक्ष भ्रष्टाचारी लोकांना पाठिशी घालत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी केरळमध्ये बोलताना म्हटलं. त्यावर आता बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या नेत्यांवर का छापे मारत नाही आहे. ते काय दूधाने धुतलेले आहे का?, असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.

“भाजपाचे १००० विधानसभा आमदार आणि ३०० वर खासदार आहेत. त्यांच्यावरती कधी केंद्रीय यंत्रणांनी छापे टाकले का?. भाजपाचे लोक दूधाने धुतलेले आहेत का?. त्यांना कोण वाचवत आहे. जे लोक सांगत आहेत, तेच त्यांना वाचवत आहे. हे जगजाहीर आहे. जे भाजपामध्ये प्रवेश करतात ते दुधाने धुतलेले होतात,” असा टोलाही तेजस्वी यादव यांनी लगावला आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

“भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत नाही”

पंतप्रधान मोदींच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, “केंद्र सरकारमधील काही लोक बोलतात. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. भ्रष्टाचाऱ्यांना कोणीही पाठिशी घालत नाही आहे. अन्य राज्यांमध्ये काय चाललं आहे, याचा त्यांनी विचार करायला हवा,” असे मुख्यमंत्री कुमार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.