सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनींना बिहार महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अजब उत्तर दिलं आहे. ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम मागाल’, असं उत्तर त्यांनी दिल्याने सध्या चर्चा रंगली आहे.

कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये विद्यार्थिनी सॅनिटरी पॅड मोफत मिळाल्यास, गरजेच्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही अशी विनंती करताना दिसत आहे. “सरकार अनेक गोष्टी मोफत देत आहे. मग ते आम्हाला २० ते ३० रुपयांत मिळणारं सॅनिटरी पॅड देऊ शकत नाहीत का?,” अशी विचारणा एका विद्यार्थिनीने केली.

यावर आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी उत्तर दिलं की “या मागण्यांना काही शेवट आहे का? उद्या तुम्ही म्हणाल सरकार जीन्स, सुंदर बूट देईल का? शेवटी जेव्हा कुटुंब नियोजनाची वेळ येईल तेव्हा तुम्हा सर्वांना मोफत कंडोमही लागेल”.

तुम्हाला सरकारकडून गोष्टी का हव्या आहेत? अशी विचारणा हरजोत कौर यांनी केली. ही विचारसरणी चुकीची असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. मुलींनी यावेळी सरकार निवडणुकीच्या वेळी अनेक गोष्टींचं आश्वासन देत असं सांगितलं तेव्हा त्यांनी “मतदान करुन नका, व्हा पाकिस्तान,” असं उत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरजोत कौर यांनी नंतर निवेदन जारी करत म्हटलं आहे की “महिलांच्या हक्क आणि सक्षमीकरणासाठी लढा देण्यासाठी मला ओळखलं जातं. बिहार महिला विकास महामंडळाने ज्यांच्याविरोधात कारवाई केली आहे, ज्यांचा प्रत्येक वेळी पराभव झाला आहे असे लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत”.