नवी दिल्ली: देशात एका दिवसात आणखी ६० हजार ७५३ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ९८ लाख २३ हजार ५४६ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ६० हजार ०१९ इतकी असून हा ७४ दिवसांतील नीचांक आहे, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे आणखी १६४७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या तीन लाख ८५ हजार १३७ वर पोहोचली असून उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या २.५५ टक्के इतके आहे.

राज्यात ८,९१२  नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या ८,९१२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २५७ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ३२ हजार होती. सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक होती. मुंबईत सर्वाधित १८,७८८ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात पुणे जिल्हा ८४२, पुणे शहर २५३, पिंपरी-चिंचवड २१३,सातारा ८५५, कोल्हापूर ९८०, सांगली ८५६, नगर ६०८ नवे रुग्ण आढळले.

मुंबईत ६९६ रुग्णांचे नव्याने निदान

मुंबई : मुंबईत नव्याने होणाऱ्या बाधितांसह मृतांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरात शनिवारी ६९६ रुग्णांचे निदान झाले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी ७२० वर गेला आहे.

शहरातील प्रतिदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही बाधितांच्या तुलनेत वाढत आहे. मुंबईत शनिवारी ७९० जण बरे होऊन घरी परतले आहेत तर, ६९६ जण नव्याने बाधित झाल्याचे आढळले आहे. चाचण्यांची संख्या ३० हजारांवर गेली असून शनिवारी ३३ हजार १३६ चाचण्या केल्या गेल्या.

शनिवारी १३ जणांचा मृत्यू झाला असून यात ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १० रुग्ण ६० वर्षांवरील होते. ४० वर्षांखालील दोन रुग्णांचा तर ४० ते ६० वयोगटातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात २०४ करोना रुग्ण

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०४ करोना रुग्ण आढळून आले. तर २७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यात दररोज आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही सर्वांत कमी रुग्णसंख्या आहे.

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient akp 94
First published on: 20-06-2021 at 01:20 IST