विरोधकांनी केलेल्या चुकीच्या प्रचारामुळे WHOच्या मंजुरीला विलंब; कोव्हॅक्सिनच्या निर्मात्यांनी व्यक्त केले मत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर काही लोक याला ‘भाजपाची लस’ म्हणून लागले, असे कृष्णा एला म्हणाले.

Covaxin bharat bioteck cmd Krishna ella vaccine nod late due to negative campaign
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एम.डी कृष्णा एला (फोटो- ANI)

भारतातील स्वदेशी करोना लस कोव्हॅक्सिनला काही महिन्यांनंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली आहे. या विलंबामुळे लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एम.डी कृष्णा एला यांनी विरोधकांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या लसीवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले तसेच याला भाजपाची लसही म्हटले गेले, असे कृष्णा एला यांनी म्हटले. याआधी भारतात कोव्हॅक्सिनचे डोस देण्यास याआधीच सुरूवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याआधीच या लसीला मान्यता दिली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोव्हॅक्सिनचा वापर होण्यासाठी या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता आवश्यक होती. गेल्या अनेक दिवसांपासून या मान्यतेची प्रतीक्षा सगळ्यांना लागली होती. अखेर डब्ल्यूएचओने कोव्हॅक्सिन परवानगी दिली.

मात्र याबाबत बोलताना भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा एला यांनी विरोधकांनी निर्माण केलेल्या प्रश्नांमुळे जगभरात या लसीबाबत गैरसमज निर्माण झाले आणि शेवटी डब्ल्यूएचओकडून या लसीला मंजुरी मिळण्यास विलंब झाला असे म्हटले लसीबाबत देशात नकारात्मक प्रचार सुरू होता आणि त्याचा परवानगी मिळण्यावर परिणाम दिसून आला असेही ते म्हणाले.

टाइम्स नाऊ समिटमध्ये बोलताना कृष्णा एला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतरही हा प्रचार थांबला नाही. यानंतर काही लोक या लसीचा प्रचार ‘भाजपाची लस’ म्हणून करू लागले. त्याऐवजी आत्मनिर्भर भारताच्या मंत्राखाली भारतीय विज्ञानाचे कौतुक करायला हवे होते.” सुरुवातीच्या टप्प्यात लसीबाबत विविध प्रकारचा प्रचार सुरु असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लस घेणाऱ्या लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लस घेतली होती.

यासोबतच कृष्णा एला यांनी कोव्हॅक्सीनचा बूस्टर डोस तयार करण्याबाबतही भाष्य केले. “दोन्ही लसींचा बूस्टर डोस ६ महिन्यांनी दिल्यास ते योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात सरकारचे म्हणणे आहे की, प्रथम प्रत्येकाला लसीचा दुसरा डोस देणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यानंतरच त्यावर काम केले जाईल. अनेक पाश्चात्य देशांनीही बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. कोव्हॅक्सीनचा बूस्टर डोस ही नाकाद्वारे देण्यात येणार आहे,” असे कृष्णा एला म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covaxin bharat bioteck cmd krishna ella vaccine nod late due to negative campaign abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?