scorecardresearch

अमेरिकेत वादळाचे आतापर्यंत ४७ बळी

फ्लोरिडा राज्याच्या दूरवर्ती भागांमध्ये मदत पोहोचली नसून लाखो घरांचा वीजपुरवठा अद्याप खंडित आहे.

अमेरिकेत वादळाचे आतापर्यंत ४७ बळी
अद्याप हजारो नागरिक पुरात अडकून पडले आहेत.

फ्लोरिडा (अमेरिका) : येथील ‘इयान’ चक्रीवादळामुळे आलेल्या पुरातील मृतांचा आकडा ४७ वर गेला आहे. हे अमेरिकेच्या किनाऱ्याला धडकलेले सर्वात शक्तिशाली वादळ मानले जात असून अद्याप हजारो नागरिक पुरात अडकून पडले आहेत. फ्लोरिडा राज्याच्या दूरवर्ती भागांमध्ये मदत पोहोचली नसून लाखो घरांचा वीजपुरवठा अद्याप खंडित आहे. अनेक रस्ते अजूनही पाण्याखाली असून पुलांचीही हानी झाली आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. मदतकार्यात अब्जाधीश एलॉन मस्क यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी पुरवलेल्या १२० स्टारिलक उपग्रहांची मदत घेऊन संपर्क साधण्याचे काम सुरू असल्याचे फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसान्टिस यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या