दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या दहशतवादविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. या विशेष पथकाने राजधानी दिल्लीत हिजबुल मुजाहिदीनच्या एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. या दहशतवाद्यावर सरकारने १० लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. हा दहशतवादी जम्मू काश्मीरमधील अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होता. या दहशतवाद्याचं नाव जावेद अहमद मट्टू असं असून तो हिजबुलचा कमांडर होता.

जावेद मट्टू यापूर्वी अनेकदा पाकिस्तानमध्येदेखील जाऊन आला आहे. तो जम्मू काश्मीरमधल्या सोपोरमधला रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी सोपरमध्ये त्याच्या भावाने घराबाहेर तिरंगा फडकवला होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते.

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
CRPF killed 1 terrorist in Pulwama
काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, CRPF च्या जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जावेद मट्टू हा A++ ग्रेडचा दहशतवादी होता. तसेच तो हिजबुलचा शेवटचा A++ ग्रेडचा दहतवादी होता. संरक्षण यंत्रणांनी अलीकडच्या काळात हिजबुलच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. तर काही दहशतवाद्यांच्या अज्ञातांनी हत्या केल्या आहेत. त्यामुळे हिजबुलचं कंबरडं मोडलं आहे. दरम्यान, पोलिसांनी जावेदला पकडल्यानंतर त्याच्याकडील पिस्तूल, गोळ्यांचं मॅगजिन, चोरी केलेली गाडी जप्त केली आहे. जावेद मट्टू हा ५ ग्रेनेड हल्ले आणि ५ पोलिसांच्या हत्येत सहभागी होता. त्याचे अनेक साथीदार पाकिस्तानमध्ये मुक्तपणे वावरत आहेत.

हे ही वाचा >> राहुल गांधीच्या पदयात्रेचं नाव आणि मार्ग बदलला; १५ राज्ये, ११० जिल्हे, तब्बल ६

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी करवाया केल्यानंतर मट्टू भूमीगत झाला होता. गुरुवारी त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बेड्या ठोकल्या.