Donald Trump Praises PM Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. अशात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

दरम्यान यामध्ये आतिरिक्त आयात शुल्कावरही चर्चा झाली असणार यात शंका नाही. ट्रम्प गेल्या काही काळापासून सतत ‘टॅरिफ बॉम्ब’ टाकत आहेत. आजही त्यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी नवीन आयात शुल्क धोरणावर स्वाक्षरी केली. पण असे दिसते की, पंतप्रधान मोदींनी अतिरिक्त आयात शुल्काच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्याशी यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत. कारण मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, “वाटाघाटी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणीही हात धरू शकत नाही. यामध्ये ते माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी उत्तम आहेत.”

पंतप्रधान मोदींचा कोणीही हात धरू शकत नाही

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील द्विपक्षीय बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की, तुम्ही नेहमीच पंतप्रधान मोदींना चांगले वाटाघाटीकार (नेगोशिएटर) म्हणता, पण आजच्या वाटाघाटीत कोणी कोणावर मात केली? या प्रश्नाला उत्तर देताना सुरुवातीलाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हसले आणि म्हणाले, “वाटाघाटी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणीही हात धरू शकत नाही. यामध्ये ते माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी उत्तम आहेत.”

पंतप्रधान मोदींवर दबाव आणण्याचा प्रयत्न

आज, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आयात शुल्काच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर दबाव आणण्यासाठी संपूर्ण रणनीती आखली होती. या रणनीतीचा एक भाग म्हणून, पंतप्रधान मोदींना भेटण्याच्या काही तास आधी, ट्रम्प यांनी नवीन आयात शुल्क धोरणावर स्वाक्षरी केली होती. या धोरणानुसार, आता इतर देश अमेरिकेवर जितके शुल्क आकारतात तितकेच शुल्क अमेरिका त्यांच्यावर लादणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांची आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून, विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. बैठकीदरम्यान रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली असून, ते संपवण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली आहे. याचबरोबर दोन्ही देशाना अनेक महत्त्वपूर्ण कारारांवर स्वाक्षऱ्या केल्या.