दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.५ एवढी नोंदवण्यात आली आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या काही भागातही भूकंपाचे झटके बसले आहेत. संध्याकाळी ७ च्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे झटके बसले आहेत.
An earthquake of magnitude 4.5 hit 63 km southwest of Gurugram Haryana: National Centre for Seismology https://t.co/zpq3ZVda9W pic.twitter.com/St0YHflaKa
— ANI (@ANI) July 3, 2020
गुरुग्राममध्ये भूकंपाचं केंद्र आहे अशी माहिती समोर आली आहे. ७ वाजून १ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के तीव्र असल्याने काही लोकही घराच्या बाहेर आले होते.