Gujarat Election 2022 Exit Polls Updates : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज (५ डिसेंबर) मतदान पार पडलं आणि निवडणुकीची रणधुमाळी संपली. आता गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस की आप जिंकणार हे ८ डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालातच स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी अनेक जनमत कल (एक्झिट पोल) जाहीर होत आहेत. त्या जनमत चाचणीप्रमाणे भाजपा, काँग्रेस आणि आपला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे याचा हा आढावा.

टुडेज चाणक्य एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा – १५०
काँग्रेस – १९
आप – ११
इतर – २

BJP test, Congress, West Nagpur,
काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
Congress has filed the nomination form of West Nagpur MLA Vikas Thackeray
नागपुरात काँग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन, विकास ठाकरेंचा अर्ज दाखल
congress government may fall in himachal
पोटनिवडणुकीनंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकार कोसळण्याची भीती; राज्यसभेतील क्रॉस व्होटिंग प्रकरण भोवणार?

ETG-TNN एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा – १३९
काँग्रेस – ३०
आप – ११
इतर – २

एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा – १३१ ते १५१
काँग्रेस – १६ ते ३०
आप – ९ ते २१
इतर – २ ते ६

टीव्ही ९ एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा – १२५ ते १३०
काँग्रेस – ४० ते ५०
आप – ३ ते ५
इतर – ३ ते ७

न्यूज एक्स-जन की बात ९ एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा – ११७ ते १४०
काँग्रेस – ३४ ते ५१
आप – ६ ते १३
इतर – १ ते २

P-MARQ एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा – १२८ ते १४८
काँग्रेस – ३० ते ४२
आप – २ ते १०
इतर – ० ते ३

२०१७ विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

भाजपा – ९९ (२०१२ च्या तुलनेत १६ जागा कमी)
काँग्रेस – ७७ (२०१२ च्या तुलनेत १६ जागा वाढल्या)
अपक्ष – ३ (२०१२ च्या तुलनेत २ जागा वाढल्या)
भारतीय ट्रायबल पार्टी – २
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – १

हेही वाचा : Gujarat Election : १६२१ उमेदवार; त्यातील महिला फक्त १३९!

गुजरात विधानसभेची स्थिती काय?

गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान झालं होतं. तसेच सोमवारी (५ डिसेंबर) दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडलं. यंदा गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.