लॉस एंजेलिस : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा ‘ट्वीट’द्वारे निषेध करणाऱ्या ‘हॅरी पॉटर’च्या प्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग यांना हत्येची धमकी देण्यात आली.

रोलिंग यांनी रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करताना ‘ट्वीट’मध्ये नमूद केले होते, की हे फारच भयंकर वृत्त आहे. मी यामुळे अस्वस्थ आहे. रश्दी लवकर बरे व्हावेत. त्यांच्या या ‘ट्वीट’वर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने सांगितले, की चिंता करू नका, यापुढचा क्रमांक आपलाच आहे. त्याने हल्लेखोर मतारचा उल्लेख ‘क्रांतिकारी शूर शिया लढवय्या’ असा केला. रोलिंग यांनी या प्रतिक्रियेचे छायाचित्र (स्क्रीन शॉट) प्रसृत केले. तसेच ‘ट्विटर सपोर्ट’ यंत्रणेला हे छायाचित्र ‘टॅग’ करून ‘ट्विटर’कडे या संदर्भात मदत मागितली. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले, की याचा पोलीस तपास करत आहेत.

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यू यॉर्क : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यांची जीवनरक्षण प्रणाली (व्हेंटिलेटर) काढण्यात आली आहे. ते बोलू शकत आहेत. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा चाकूहल्ला करण्यात आला. हा हल्ला सुनिश्चित व पूर्वनियोजित होता. त्यामागे कोणतीही चिथावणी नव्हती. दरम्यान, न्यायालयाने हल्लेखोर हदी मतार याला जामीन देण्यास नकार दिला आहे.