Hindu Girl : हिंदू कुटुंबातील मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानंतर तिच्या संतापलेल्या कुटुंबाने तिचं श्राद्ध घातलं. आजपासून आमच्यासाठी ती मेली त्यामुळे आम्ही तिचं श्राद्ध घालत आहोत, असं या मुलीच्या कुटुंबाने म्हटलं आहे. एकदा ती मुस्लिम मुलासह पळून गेली होती पण तेव्हा तिला कुटुंबाने परत आणलं होतं. आता तिने त्या तरुणाशी लग्न केलं त्यामुळे कुटुंबाने ती आमच्याठी गेली म्हणत तिचं श्राद्ध घातलं.

नेमकी ही घटना कुठे घडली?

ही घटना बंगालमध्ये घडली आहे.बंगालच्या कृष्णगंज भागात ही मुलगी आणि तिचं कुटुंब राहतं. तिने मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही मुलगी बारावी झालेली आहे ती महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होती. पण तिने अशा पद्धतीचा निर्णय घेतल्याने तिच्या घरातले प्रचंड नाराज झाले. या मुलीचे वडील इस्रायल मध्ये काम करतात. त्यांनी सांगितलं आमच्या मुलीने आमच्यापुढे काही पर्यायच ठेवला नाही त्यामुळे आम्हाला ती मेली असं जाहीर करुन आम्ही तिचं श्राद्ध घालत ती आमच्यासाठी गेली हे सगळ्यांना समजावं म्हणून आम्ही तिचं श्राद्ध घातलं असं या मुलीच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीच्या काकांनी आणि आईने काय म्हटलं आहे?

मुलीचे काका म्हणाले तिने धर्मात लग्न केलं नाही, मुस्लिम मुलाशी लग्न केलं. ती आम्हाला मेली तिची ही चूक आम्ही कधीही मान्य करणार नाही. त्यामुळे आता आम्ही तिचं श्राद्ध घातलं आहे. तर मुलीच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलीने माझं किंवा तिच्या वडिलांचं काही एक ऐकलं नाही. तिच्या अशा वागण्याचा आम्हाला प्रचंड त्रास झाला. दरम्यान या पळून गेलेल्या मुलीने आपण सासरच्या लोकांसह आनंदी आहोत असं म्हटलं आहे. तसंच मी सासरच्या लोकांसह आणि माझ्या पतीसह राहणार आहे. मी त्या घरी जाणार नाही असंही तिने म्हटलं आहे.