केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पाचवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प नोकरदार वर्गाला दिलासा देणारा ठरला आहे. विविध घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. अमृत काळातला हा अर्थसंकल्प आहे असं वर्णन करण्यात आलं आहे. या अर्थसंकल्पाबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी भूमिका मांडली आहे. अर्थसंकल्प निवडणुकीच्या पूर्वीचा आहे त्यामुळे तो पैशांची उधळपट्टी करणारा असेल अशी अटकळ लावली जात होती. मात्र ती अटकळ चुकीची ठरवत निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. ही बाब अतिशय अभिनंदास्पद म्हणायला हवी असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे. पाहा व्हिडिओ-
