India Pakistan Tensions Updates उरी, कुपवाडा, तंगधारमध्ये दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे. भारत पाकिस्तानवर सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. होथियापूरमध्ये पाकिस्तानची मिसाईल पाडण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला त्यात २६ पर्यटकांना ठार करण्यात आलं. त्या हल्ल्याचं उत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. मात्र यानंतर पाकिस्तानकडून होणारी आगळीक थांबलेली दिसत नाही. ज्यानंतर आता भारताने जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. याच संदर्भातले लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊ ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Operation Sindoor Live Updates : पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारताचा 'करारा जवाब'

06:09 (IST) 10 May 2025

India Pakistan Tensions : पठाणकोटमध्ये आणखी सायरन आणि स्फोटांचे आवाज; भारतीय सैन्यांचं जोरदार प्रत्युत्तर

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू केला. किस्तानी सैन्याने केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, आता पठाणकोटमध्ये आणखी स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

05:13 (IST) 10 May 2025

भारत-पाकिस्तानमधील तणावानंतर पूंछ शहरातील अनेक रहिवासी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू केला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की १९७१ च्या युद्धानंतर त्यांनी कधीही पाहिले नसलेल्या तोफखान्यांच्या गोळीबारात पाच मुलांसह १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एका प्रार्थनास्थळावर एका शैक्षणिक संस्थेवर वन विभागाच्या कार्यालयावर आणि बस स्टँडवरही हल्ला झाला. बुधवारी दुपारी गोळीबार थांबला तेव्हा स्थलांतर सुरू झालं. जे लोक निघून गेले त्यापैकी बरेच जण सुरनकोट, मंडी किंवा दूर जम्मू शहरात गेले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसताना लोक डोक्यावर सामान घेऊन सुरनकोटकडे चालत जाताना दिसले, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

03:48 (IST) 10 May 2025

दक्षिण गुजरात किनाऱ्यावर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश

मच्छिमार समुदायाला समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांना भेट देऊन त्यांना सुरक्षा वाढवण्याबद्दल माहिती देण्यापर्यंत दक्षिण गुजरातमधील पोलिसांनी शुक्रवारी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०० किलोमीटरच्या किनारपट्टी भागात समुद्री दक्षता वाढवत अनेक उपाययोजना हाती घेतल्या. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

03:38 (IST) 10 May 2025

India Pakistan Tension : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ३२ विमानतळावरील उड्डाणे १५ मेपर्यंत बंद

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर
02:42 (IST) 10 May 2025

India Pakistan Tension : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला ते राजस्थानच्या बारमेरपर्यंतचे ड्रोन हल्ले रोखले, भारतीय लष्कराचं जोरदार प्रत्युत्तर

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. ...सविस्तर बातमी
01:35 (IST) 10 May 2025

India Pakistan Tension : काश्मीर खोऱ्यात ब्लॅकआउट, श्रीनगर विमानतळासह अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज

पाकिस्तानची आगळीक सुरु असून पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. ...वाचा सविस्तर
00:40 (IST) 10 May 2025

भारतीय सैन्याचं एलओसीवर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर

नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) पाकिस्तानी सैन्याने भारतीय शहरांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत असल्याची माहिती संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

00:07 (IST) 10 May 2025

बारामुल्ला ते भूजपर्यंत नियंत्रण रेषेवर २६ ठिकाणी ड्रोन दिसले, भारतीय सैन्यांनी ड्रोन रोखले

पाकिस्तानची आगळीक सुरु असून पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढल्याची परिस्थिती समोर येत आहे. तसेच पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताचं सैन्यही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानची आगळीक सुरु असून पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढल्याची परिस्थिती समोर येत आहे. तसेच पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताचं सैन्यही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. उत्तरेकडील बारामुल्ला ते दक्षिणेकडील भूज पर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानशी असलेल्या नियंत्रण रेषेवर २६ ठिकाणी ड्रोन दिसले आहेत. यामध्ये नागरी आणि लष्करी लक्ष्यांना संभाव्य धोका निर्माण करणारे संशयित सशस्त्र ड्रोन समाविष्ट आहेत. या ठिकाणी बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला यांचा समावेश आहे, असं वृत्त संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

00:03 (IST) 10 May 2025

India Pakistan Tension : पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट, सायरन अन् स्फोटांचे आवाज; पाकिस्तानी ड्रोन एका घरावर पडल्याने तिघेजण जखमी

India Pakistan Tension : शुक्रवारी रात्री पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. यावेळी फिरोजपूरमध्ये सायरन आणि स्फोटांचे आवाज नागरिकांना आले. ...सविस्तर वाचा
22:46 (IST) 9 May 2025

Pakistan Drone Attack : पंजाबमधील होशियारपूर आढळले पीएल-१५ क्षेपणास्त्राचे अवशेष; नागरिकांमध्ये घबराट

पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्यात आले. या ड्रोन हल्ल्याला भारताच्या सैन्याने जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ...सविस्तर बातमी
22:39 (IST) 9 May 2025

गुजरातच्या संतलपूर तालुक्याच्या सीमेवरील गावांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट

"खबरदारीचा उपाय म्हणून पाटण जिल्ह्यातील संतलपूर तालुक्याच्या सीमेवरील गावांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचा आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे", असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

22:15 (IST) 9 May 2025

फिरोजपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट, सायरन अन् स्फोटांचे आवाज, पाकिस्तानी ड्रोन घरावर पडल्याने एक कुटुंब जखमी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत 'एअर स्ट्राईक' करत पाकिस्तानमधील ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत प्रत्युत्तर दिलं. मात्र, यानंतर अद्यापही पाकिस्तानची आगळीक सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. पंजाबच्या फिरोजपूरमधील एका निवासी भागात पाकिस्तानी ड्रोनने हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या ड्रोनला भारताने रोखलं. मात्र, फिरोजपूरमध्ये एका घरावर ड्रोन पडल्यामुळे एका कुटुंबातील तिघे जण भाजल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फिरोजपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले आहे आणि सायरन आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

20:37 (IST) 9 May 2025

जम्मूमध्ये ब्लॅकआउट, शहरात घुमतायत सायरनचे आवाज; ओमर अब्दुल्ला यांनी दिली माहिती

शुक्रवारी पहाटे पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर आज पुन्हा जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे. तसेच शहरात शहरात सायरन ऐकू येत आहेत, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली आहे.

20:02 (IST) 9 May 2025

"त्यांचं मनोधैर्य आपण खच्ची करता कामा नये", महिला लष्करी अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावलं!

Col Sophiya Qureshi: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान युक्तिवादात वकिलांनी दिला कर्नल सोफिया कुरेशींचा संदर्भ! ...अधिक वाचा
17:41 (IST) 9 May 2025

पाकिस्तानने ३०० ते ४०० ड्रोन्सचा हल्ला भारतावर केला होता-कर्नल सोफिया कुरेशींची माहिती

कर्नल सोफिया कुरेशी यांनी काय सांगितलं?

८ आणि ९ मेच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतावर निशाणा साधत भारतीय वायुक्षेत्राचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्याने गोळीबारही सुरुच ठेवला होता. नियंत्रण रेषेजवळ हा गोळीबार सुरु होता. घुसखोरी करण्यासाठी ३०० ते ४०० ड्रोन वापरण्यात आले. मात्र भारतीय सशस्त्र दलांनी अनेक ड्रोन्स पाडले. हे ड्रोन इतक्या मोठ्या प्रमाणावर धाडण्याचं कारण आपल्या देशातली गुप्त माहिती मिळवणं असा होता. ड्रोनचा जो ढिगारा आहे त्याचा फॉरेन्सिक तपास केला जातो आहे. प्राथमिक अहवालावरुन असं कळतंय की हे तुर्की ड्रोन आहेत. पाकिस्तानच्या एका सशस्त्र युव्हीने भटिंडा स्टेशनवर लक्ष्य साधलं होतं. मात्र ते निष्क्रिय करण्यात आलं. चार ठिकाणी सशस्त्र ड्रोन लाँच केलं होतं.

उरी, अखनूर, पूँछ, सशस्त्र ड्रोन्स यांचा उपयोग करुन गोळीबार केला. त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिलं गेलं. त्यांचंही मोठं नुकसान आपल्या देशाने केलं. पाकिस्तानचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा दिसून आला. ७ मे च्या रात्री एक ड्रोन हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने नागरि हवामान क्षेत्र बंद केलं नाही. पाकिस्तान ते एखाद्या ढालीसारखं वापरतो आहे.

16:51 (IST) 9 May 2025

आज झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय निर्देश दिले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे...

- प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.

- ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.

- ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.

- केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.

- प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.

- प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.

- एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.

- पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.

- सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.

- सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या

- नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.

- शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या

- सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.

16:26 (IST) 9 May 2025

India-Pakistan Tense Situation: सीमेवर तणावपूर्ण स्थिती असतानाही शेअर बाजारात मोठी पडझड का नाही? काय आहे यामागचं कारण?

Operation Sindoor & Bombay Stock Exchange: मुंबई शेअर बाजारात भारत-पाकिस्तान तणावाचे काय परिणाम दिसले? ...सविस्तर बातमी
15:25 (IST) 9 May 2025

सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्यास कारवाई होणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येत्या दोन ते तीन दिवसांत नौदल, वायूदल, लष्कर, भारतीय तटरक्षक दल यांच्याशीही चर्चा होईल. महाराष्ट्र शासनाकडून जे काही सहकार्य हवं असेल त्याबाबतही चर्चा होईल. आज सुरक्षा सचिवांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने सगळ्यांनाच अलर्ट करण्याची चर्चा आज झाली. तसंच खोट्या बातम्या सोशल मीडियावरुन पसरवल्या जातात तो गंभीर गुन्हा आहे. त्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे याबाबतही चर्चा आणि निर्णय झाला आहे. लोकांना आमची विनंती आहे की सैन्य दलांकडून, तट रक्षक दलांकडून जी काही तयारी केली जाते आहे त्याचं चित्रीकरण करुन, व्हिडीओ काढून प्रसारित करु नये. सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, त्याबाबतही चर्चा झाली, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

14:44 (IST) 9 May 2025

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात पूँछचं सर्वाधिक नुकसान -मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

पाकिस्तानच्या हल्ल्यात पूँछचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. तसंच पूँछमध्ये सामान्य लोकांचा मृत्यू झाला आहे. पूँछमध्ये जास्त नुकसान झालं आहे. मी जम्मूच्या रुग्णालयात होतो तेव्हा तिथे असलेले जखमी हे पूँछमधले होते. एक रुग्ण जास्त गंभीर जखमी होता. त्यांना चंदीगडला धाडण्यात आला आहे. काश्मीरचे उपमुख्यमंत्री पूँछला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तिथे पोहचले तर लोकांशी चर्चा करतील असं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी सांगितलं.

14:28 (IST) 9 May 2025

पाकिस्तानी सीमा आणि विमानतळांच्या सुरक्षेचा गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

पाकिस्तानी सीमेवरील सुरक्षा आणि विमानतळांवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी बीएसएफचे महासंचालक, सीआयएसएफ, बीसीएएस, गृहसचिव, आयबी संचालकांबरोबर बैठक घेतल्याची माहिती मिळत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

13:59 (IST) 9 May 2025

ऑपरेशन सिंदूरचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं कौतुक

"ऑपरेशन सिंदूर भारत सरकारच्या नेतृत्वात आणि सैन्य दलांनी उचलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. जे क्रूर हत्याकांड दहशतवाद्यांनी घडवून आणलं आणि भ्याड हल्ला केला तेव्हापासूनच देशवासियांच्या मनात पीडित कुटुंबांना, माता भगिनींना न्याय मिळावा ही देशभावना होती. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आम्ही सरकारचं आणि सैन्य दलांचं अभिनंदन करतो." असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

13:19 (IST) 9 May 2025

महाराष्ट्रातील पोलीस, नौदल, तटरक्षक दल सगळे अलर्ट मोडवर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस, कोस्टगार्ड, नौदल सगळे अलर्ट मोडवर आहेत. त्यांना निर्देश दिले आहेत. आमच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने एक आढावाही आम्ही घेणार आहोत. आम्ही पूर्णपणे सावधगिरी बाळगली आहे. आज दुपारी अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात आम्ही बैठक ठेवली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.

13:02 (IST) 9 May 2025

पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज, भाजपा प्रवक्ते जयवीर शेरगील यांचं वक्तव्य

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर संपलं नसल्याचं जाहीर केल्यानंतर पाकिस्तानतर्फे हल्ले करण्यात येत आहेत. त्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्य दलांकडून दिलं जातं आहे. पाकिस्तानने कुरापती काढणं सोडलं पाहिजे, तसं न झाल्यास योग्य धडा शिकवणारच असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी म्हटलं आहे.

12:38 (IST) 9 May 2025
भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढला, आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याची चिन्हं

भारत पाकिस्तान सीमांवरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याची चिन्हं आहेत. भारत सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर बीसीसीआयने याबाबत अधिकृत दुजोरा दिला असून, ही स्पर्धा पुढे ढकलण्याची योग्य वेळ नाही आणि खेळाडूंच्या सुरक्षेशी तडजोड होणार नाही हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.

10:38 (IST) 9 May 2025

रात्रभरात भारत पाकिस्तान सीमांवर आणि इतर भागांमध्ये काय घडलं?

भारतानं पाकिस्तानमधील ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची आगळीक वाढली आहे. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून भारताती काही लक्ष्य करून ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र, भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आणि भारतीय लष्कर पाकिस्तानच्या या कुरापतींसाठी सज्ज असल्यामुळे भारतानं ड्रोनचे हे हल्ले निष्प्रभ ठरवले. त्यानंतर भारताकडूनही पाकिस्तानमधील काही ठिकाणांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात आले. त्यामुळे सीमेच्या दोन्ही बाजूला काही भागांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

09:10 (IST) 9 May 2025

Pakistan Drone Video: "आम्ही काहीच केलं नाही", पाकिस्ताननं कांगावा केला आणि भारतीय लष्करानं पुरावाच दिला!

Pakistan Drone Attack in India: पाकिस्ताननं भारतीय हद्दीत ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. ...अधिक वाचा
07:43 (IST) 9 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवली उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. त्यानंतर ही बैठक बोलवण्यात आली आहे. रात्री झालेल्या पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने चोख उत्तर दिलंं आहे. त्यांचे सगळे हल्ले परतवून लावले आहेत.

पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून आगळीक झाल्यास सहन करणार नाही एस. जयशंकर यांचा इशारा

पाकिस्तानकडून हल्ले सुरुच, भारताने ५० ड्रोन केले नेस्तनाबूत

जे.डी. व्हान्स यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, अमेरिका भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही.