Long Range Forecast of Monsoon 2025 Event : भारतीय हवामान विभाग आज (१५ एप्रिल) पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद घेतली जाईल. यावर्षी देशात मान्सूनची स्थिती कशी असेल? याबाबतची माहिती आज दिली जाईल. हवामान विभागाचा मान्सूनबाबातचा हा पहिलाच अंदाज असेल. या पत्रकार परिषदेतून हवामान विभाग काय माहिती देतंय याकडे सर्वांचं, प्रामुख्याने शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

Monsoon Forecast India 2025 Prediction Live, 15 April 2025 : हवामान विभागाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे वाचा एकाच क्लिकवर.

15:41 (IST) 15 Apr 2025

यंदा १०५ टक्के पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे की नैऋत्य मोसमी पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. या काळात ५९ टक्के पावसाचा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा पाच ते १० टक्के अधिक पावसाचा अंदाज आहे.

15:37 (IST) 15 Apr 2025

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

यंदा सरासरीपेक्षा जास्त, १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात गेल्या पाच दशकांपासून दर वर्षी सरासरी ८७ सेमी पाऊस पडतो. यामध्ये यंदा पाच टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच यंदा ९१ सेमी पावसाचा अंदाज आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आणि शास्त्रज्ञ आर. के. जेनामणी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

14:56 (IST) 15 Apr 2025

विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज

विदर्भातील भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

14:55 (IST) 15 Apr 2025

मराठवाड्याला यलो अलर्ट

मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव इथंही पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना ही यलो अलर्ट जारी केला आहे.

14:23 (IST) 15 Apr 2025

५ दिवस जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा बसला आहे. पिके व फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

13:55 (IST) 15 Apr 2025

दुपारी तीन वाजता हवामान विभागाची पत्रकार परिषद

दुपारी तीन वाजता हवामान विभागाची पत्रकार परिषद सुरू होईल.