भारतात दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. त्यासाठी हजारो ट्रेन रोज धावतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक लोक सुखकर आणि जलद प्रवासासाठी ट्रेन प्रवासाला पसंती देतात. भारतीय रेल्वेचे जाळे इतके मोठे आहे की, लोकांना त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींची नीट माहिती नसते. भारतात दररोज सुमारे २२,५९३ ट्रेन धावतात. त्यापैकी १३,४५२ प्रवासी ट्रेन आहेत. त्यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत आणि इतर एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. काही गाड्या वर्षभर धावत असल्या तरी काही गाड्या अशा आहेत की, ज्या प्रवाशांना घेऊन जात नाहीत. आज आपण भारतातील अशा पाच रेल्वे गाड्यांबद्दल जाणून घेणार आहोत; ज्या भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई करून देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळूरु – राजधानी एक्स्प्रेस

सर्वाधिक कमाई करणाऱ्या ट्रेनमध्ये बंगळूरु – राजधानी एक्स्प्रेसचे नाव घेतले जाते. उत्तर रेल्वेची ही सर्वांत फायदेशीर ट्रेन आहे. या ट्रेनने २०२२- २३ मध्ये १७६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सियालदह राजधानी एक्सप्रेस

सियालदह राजधानी एक्सप्रेस ही नवी दिल्ली ते पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील सियालदहपर्यंत धावते. २०२२-२३ मध्ये या रेल्वेने एकूण १,२८,८१,६९,२७४ रुपये इतकी कमाई केली आहे.

दिब्रुगढ – राजधानी एक्स्प्रेस

नवी दिल्ली आणि दिब्रुगढदरम्यान धावणाऱ्या या ट्रेनने २०२२-२३ मध्ये एकूण १,२६,२९,०९,६९७ रुपयांची कमाई केली आहे.

मुंबई – राजधानी एक्स्प्रेस

नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या या राजधानी एक्स्प्रेसने २०२२-२३ या वर्षात रेल्वेला १,२२,८४,५१,५५४ रुपये कमावले.

दिब्रुगढ – राजधानी एक्सप्रेस

दिब्रुगढ – राजधानी एक्स्प्रेसने एक वर्षात रेल्वेला एकूण १, १६,८८,३९,७६९ रुपये मिळवून दिले आहेत.
(दिब्रुगढ – राजधानी एक्स्प्रेसमध्ये अप आणि डाऊन असा फरक आहे.)

भारतात रात्रंदिवस धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या आहेत आणि यातील काही गाड्या प्रचंड कमाई करून देत असल्याने रेल्वेसाठी त्या महत्त्वाच्या आहेत. प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त भारतीय रेल्वेकडे ९,१४१ मालगाड्या आहेत. रेल्वेचे हे नेटवर्क देशभरात ६७,३६८ किमीपर्यंत पसरले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways earns the most from these 5 trains travel by flight for their fares sjr
First published on: 11-10-2023 at 18:31 IST