भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमध्ये थेट तसेच भारतातील शाखा व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गुंतलेला निधी २०२० अखेरपर्यंत २.५५ अब्ज स्विस फ्रँक अर्थात सुमारे २०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. गुरुवारी स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून जाहीर झालेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. त्यानंतर हे वृत्त माध्यमांमधून समोर आले होते. माक्ष अर्थमंत्रयाने वृत्त नाकारले आहे. मंत्रालयाने स्विस बँकांमधील ठेवींमधील वाढ किंवा घट याची पडताळणी करण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.

मंत्रालयाने शनिवारी ट्विट याबाबत स्विस अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असल्याची माहिती दिली. मंत्रालयाने प्रसिध्दीपत्रक जारी करत म्हटले आहे की, शुक्रवारी असे अनेक अहवाल प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते ज्यात असे म्हटले आहे की सन २०२० अखेर स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या भारतीयांचे पैसे २०,७०० कोटी रुपयांवर गेले आहेत. २०१६ साली ही रक्क्म ६,६२५ कोटी होती. दोन वर्षांपासून घसरण होत असताना यावेळी स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या भारतीयांच्या पैशात वाढ झाली असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. गेल्या १३ वर्षातील ठेवींमधील ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याचेही मीडियाच्या वृत्तांत म्हटले होते.

हे ही वाचा >> स्विस बँकांतील भारतीयांच्या निधीत तिपटीने वाढ

माध्यमांच्या रिपोर्ट्सच्या वृत्तांमधून असे कळते की, बॅंकांनी स्विस नॅशनल बँक (एसएनबी) कडे नोंदविलेले अधिकृत आकडेवारी आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी ठेवलेली ही रक्कम काळा पैसा असल्याचे दर्शवत नाही. शिवाय, या आकडेवारीत अनिवासी भारतीय किंवा अन्य लोकांद्वारे तिसऱ्या देशातील संस्थांच्या नावावर स्विस बँकांमध्ये पैसे असू शकतात, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

“२०१९ अखेरपासून ग्राहकांनी जमा केलेली रक्कम कमी झाली आहे. सन २०१९च्या अखेरीस विश्वासदर्शक संस्थांमार्फत असणारा निधीही निम्म्याहून अधिक खाली आला आहे. सर्वात मोठी वाढ ही बाँड्स, सिक्युरिटीज आणि इतर अनेक वित्तीय साधनांच्या रूपात आहे”, असे मंत्रालयाने सांगितले.

“भारत आणि स्वित्झर्लंड यांनी कर प्रकरणी परस्पर प्रशासकीय सहाय्य (मॅक) च्या बहुपक्षीय अधिवेशनावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशांनी बहुपक्षीय सक्षम प्राधिकरण करारावर (एमसीएए) स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार, २०१८ नंतर वार्षिक खात्यातील माहिती सामायिक करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉरमेशन (एईओआय) कार्यान्वित केले गेले आहे,” असे मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे.

भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये २०१२ मध्ये तसेच २०२० मध्ये त्यांच्या नागिकांच्या आर्थिक माहितीची देवाणघेवाण केली. वित्तीय खात्यांच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सध्याची कायदेशीर व्यवस्था पाहता भारतीय रहिवाशांच्या अघोषित उत्पन्नांपेक्षा स्विस बँकांमध्ये ठेवी वाढण्याची कोणतीही संभाव्य शक्यता दिसत नाही, असे मंत्रालयाने नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रालयाने स्विस अधिकाऱ्यांकडे माध्यमांद्वारे देण्यात आलेल्या या माहिती बद्दल पुरवाच्या मागणी केली आहे. दोन वर्षांच्या घसरणीच्या प्रवाहाच्या विपरीत २०२० मधील भारतीयांच्या स्विस बँकांतील एकूण निधीने मागील १३ वर्षांतील सर्वोच्च स्तर गाठला आहे. २०१९च्या अखेरीस ८९.९ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ६,६२५ कोटी रुपये) असणाऱ्यां निधीत वर्षभराच्या कालावधीत तिपटीहून मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी २००६ मध्ये भारतीयांच्या निधीने ६.५ अब्ज स्विस फ्रँक अशी विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतरच्या वर्षात मात्र त्याला उतरती कळा लागली होती. रोखे अथवा तत्सम साधनांद्वारे भारतीयांच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असली, तरी ठेवींच्या रूपातील भारतीयांचा पैसा मात्र घसरत आला आहे.