scorecardresearch

Indore temple tragedy : बेलेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव सुरू असताना कोसळलं विहिरीचं छत, २५ भाविक अडकल्याची भीती

बेलेश्वर मंदिरात या अपघातानंतर बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे

Indore temple tragedy on Ram Navami
जाणून घय़ा नेमकी काय घडली घटना?

Indore temple tragedy: इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी अचानक विहिरीचं छत कोसळलं. २५ ते ३० भाविक या विहिरीत कोसळले आहेत. मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता त्यावेळी विहिरीचं छत कोसळलं आणि त्यामध्ये २५ ते ३० भाविक पडले. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

इंदूरमधल्या स्नेहनगरमध्ये पटेलनगर हा भाग आहे. या ठिकाणी बेलेश्वर मंदिर आहे. या मंदिरात विहिर आहे. खूप आधीपासून ही विहिर आहे. भाविक रामनवमीच्या उत्सवासाठी या ठिकाणी जमले होते. मात्र छत कोसळून अपघात झाला आहे त्यामुळे २५ ते ३० भाविक या ठिकाणी अडकले आहेत. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता आहे. विहिरीचं छत कोसळून हा अपघात झाला आहे. जो विहिरीचा भाग होता त्यावर मंदिर होतं. विहिरीचं छत कोसळून अपघात झाला आहे. आता इंदूरच्या बेलेश्वर मंदिर भागात बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. युवराज सिंग मान या स्थानिक पत्रकाराने या घटनेचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

अडकलेल्या भाविकांपैकी ८ जणांना बाहेर काढण्यात यश

अडकलेल्या भाविकांपैकी ८ जणांना बाहेर काढून त्यांना रूग्णालयात नेण्यात आलं आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी मदत देण्याचे आदेश दिले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी रामनवमीचा उत्सव सुरू होता. या मंदिरातच एक जुनी विहिर होती. या विहिरीचं छत कोसळून अपघात झाला

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:52 IST

संबंधित बातम्या