वॉलमार्टच्या लॉबिंगची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

भारतीय किराणा बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यासाठी अमेरिकन कंपनी वॉलमार्टने भारतात लॉबिंगवर केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या खर्चाची निवृत्त न्यायाधीशांकडून कालबद्ध पद्धतीने चौकशी करण्याची विरोधी पक्षांची मागणी यूपीए सरकारने मान्य केली आहे.

भारतीय किराणा बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यासाठी अमेरिकन कंपनी वॉलमार्टने भारतात लॉबिंगवर केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या खर्चाची निवृत्त न्यायाधीशांकडून कालबद्ध पद्धतीने चौकशी करण्याची विरोधी पक्षांची मागणी यूपीए सरकारने मान्य केली आहे. लोकसभेत संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी बुधवारी ही घोषणा केली. वॉलमार्टने अमेरिकी सिनेटला दिलेल्या अहवालात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी लॉिबगवर सव्वाशे कोटी रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षांनी गेल्या दोन दिवसांपासून ठप्प केले होते. या प्रकरणाची चौकशी करायला सरकारला अजिबात संकोच नसून निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करून सभागृहापुढे शक्य तितक्या लवकर चौकशी अहवाल मांडण्यात येईल, असे  लोकसभेचे कामकाज सुरू होताच कमलनाथ यांनी जाहीर केले.
भारतीय कंपन्यांचेही लॉबिंग
वॉशिंग्टन : वॉलमार्टने केलेल्या लॉबिंगवर भारतात वादंग निर्माण झाले असताना सुमारे २७ भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत वेगवेगळय़ा कारणांसाठी ‘पैसा’ खर्च केल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाकडील नोंदीनुसार विप्रो, टाटा सन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लि., रॅनबॅक्सी लॅब अशा नामांकित कंपन्यांनी अमेरिकेतील व्हिसापासून संरक्षण बाजारपेठेपर्यंतच्या क्षेत्रांत शिरकाव करण्यासाठी तेथील लॉबिंगतज्ज्ञ कंपन्यांना शुल्क दिल्याचे दिसून आले आहे.    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inquiry thru retaired justis of walmart lobbing

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या