काश्मीरमध्ये तापमान गोठणिबदूखाली

येत्या २४ तासांत काश्मीरमध्ये काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे

श्रीनगर : काश्मीरमधील तापमान हे रात्रीच्या वेळी गोठणिबदूच्या खाली गेले असून या मोसमात प्रथमच ते इतके खाली गेले आहे. काश्मीर खोऱ्यात आता थंडी पडू लागली असून काश्मीरच्या अनेक भागात रविवारी धुके दिसत होते. तापमान गोठणिबदूच्या खाली गेल्याने सकाळच्या वेळी धुके दाटले होते. काश्मीर खोऱ्यात प्रथमच तापमान गोठणिबदूच्या खाली गेल्याने थंडीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रीनगरमध्ये तापमान उणे ०.९ अंश सेल्सियस होते.  पहलगाम हे अमरनाथ यात्रेसाठीचा मुक्काम तळ असून तेथे उणे ३.५ अंश सेल्सियस तापमान होते. पहलगाम हे काश्मीरमधील सर्वात थंड ठिकाण आहे.

बर्फवृष्टीची शक्यता.. येत्या २४ तासांत काश्मीरमध्ये काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये  थंडीची तीव्रता पुढील काळात वाढत जाणार आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात थंडी कडक असते. २१ डिसेंबरपासून चिलाई कलान हा कडक थंडीचा काळ सुरू होत आहे. २० नोव्हेंबपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kashmir reels under sub zero temperatures zws

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या