एपी, टोकियो : शक्तिशाली चक्रीवादळ ‘खानून’ मंगळवारी जपानच्या नैऋत्य बेटाच्या ओकिनावाकडे सरकत आहे. परिणामी या भागात वेगवान वारे आणि सागरी लाटा उंच उसळत आहेत. परिणामी वाहतूक ठप्प झाली असूनही येथील बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मंद गतीने सरकणाऱ्या या वादळाचे नाव ‘खानून’ ठेवले आहे. ‘खानून’ या थाई भाषेतील शब्दाचा अर्थ ‘फणस’ असा आहे. मंगळवारी सकाळी वायव्येकडे २० किलोमीटर प्रतितास (१२.४ मैल प्रतितास) वेगाने वायव्येकडे जात होते. वाऱ्यांचा वेग १६२ किलोमीटर प्रतितास (१०० मैल प्रतितास) आहे. ते ओकिनावाच्या मुख्य बेटाच्या आग्नेयेस समुद्रात होते, असे जपानच्या हवामान संस्थेने सांगितले. धोकादायक वाऱ्यांमुळे ओकिनावाची प्रांतीय राजधानी ‘नाहा’ येथील शहरातील कार्यालये मंगळवारी बंद ठेवली. तसेच येथील ‘सुपरमार्केट’ साखळीही बंद ठेवण्यात आली. काही दुकाने अल्पकाळ सुरू होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जपानची राष्ट्रीय वाहिनी ‘एनएचके’वर प्रक्षेपित दृश्यांत नाहा येथे रस्त्यावर झाडे उन्मळून पडलेली दिसत होती. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सेऊल, हाँगकाँग, तैपेई आणि शांघायकडे जाणारी १२ हून अधिक आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे, तसेच नाहा विमानतळावरील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली. नाहा, ओकिनावा येथील सार्वजनिक वाहतूक आणि  बेटांना जोडणाऱ्या फेऱ्या थांबवल्या होत्या.